नंदुरबार : सराफा बाजारातील ज्वेलरीचे दुकान फोडून अडीच लाखांचा ऐवज चोरून नेणा:या चोरटय़ास अवघ्या आठ तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आले. सीसीटीव्ही कॅमे:यात कैद झालेला चोरटय़ाला लागलीच पोलिसांनी ओळखल्याने चोरी करून घरी येवून आरामात झोपलेल्या चोरटय़ाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. दरम्यान, याच चोरटय़ाने जवळच असलेले हॅण्डलूमचे दुकान देखील फोडले होते.संतोष दिलीप तिजवीज (32) रा.बाहेरपुरा, नंदुरबार असे चोरटय़ाचे नाव आहे. नंदुरबारातील सराफा बाजारातील भर रस्त्यावरील व फडके पोलीस चौकीपासून काही अंतरावर असलेले साई-श्रद्धा ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकवून चोरटय़ाने दुकानात प्रवेश केला. दुकानातील काऊंटरवर असलेले सुमारे दोन लाख 42 हजार 745 रुपयांचे दागीने त्याने चोरून नेले. दुकानातील तिजोरी फोडण्याचाही त्याने प्रय} केला परंतु त्याला यश आले नाही. त्यामुळे मोठी रक्कम वाचली. त्यानंतर चोरटा तेथून पसार झाला. सकाळी सहा वाजता दुकानाच्या शेजारी राहणा:यांच्या लक्षात चोरीची बाब लक्षात आल्यावर तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस ठाण्याचे निरिक्षक गिरीश पाटील, शहर वाहतूक शाखेचे निरिक्षक सुभाष भोये घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही तपासाबाबत मार्गदर्शन केले. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकात गवळी यांनी माहिती घेवून पथकाला काही सुचना केल्या.याच चोरटय़ाने जवळच असलेल्या नॅशनल हॅण्डलूम दुकानाचे कुलूप तोडून त्यातून देखील त्याने शाल चोरल्याचे सांगितले. दुकानात रोख रक्कम न मिळाल्याने त्याने थंडीपासून बचावासाठी शाल घेवून ज्वेलरीचे दुकान फोडले. तेथे देखील पोलिसांनी तपास केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले, शहर पोलीस ठाण्याचे गिरीश पाटील, वाहतूक शाखेचे सुभाष भोये, हवालदार रामा वळवी, अरुण सैंदाणे, योगेश लोंढे, विजय ढिवरे, लक्ष्मीकांत निकुंभ, शैलेश गावीत, विकास पाटील, राकेश मोरे यांनी केली. दरम्यान, सराफा बाजारातील अनेक दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यामुळे त्याचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे बाजारातील इतर दुकानादारांनी देखील आपल्या दुकानात आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावावे असे आवाहन शहर पोलीस निरिक्षक गिरीश पाटील यांनी केले आहे. दुकानाच्या समोरच असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी तपासले असता पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास डोक्यात टोपी घातलेला आणि अंगावर शाल पांघरलेला व्यक्ती या दुकानाच्या परिसरातून दोन ते तीन वेळा ये-जा करतांना आढळून आला. त्याचे बारकाईने निरिक्षण केले असता गुन्हे शोध पथकाचा पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार संतोष तिजवीज याच्यावर संशय आला. लागलीच त्याच्या घरी जावून त्याला ताब्यात घेतले. त्याने चोरी करतांना घातलेले कपडे अंगावरच होते. त्यामुळे त्याचा फोटो मोबाईलमध्ये काढून लागलीच सीसीटीव्ही फुटेज तपासाण्या कर्मचा:यांना पाठविण्यात आला. पडताळणी केला असता संतोषच असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पथकाने पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली. परंतु उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने चोरीची कबुली दिली. शिवाय चोरीतील दोन लाख 42 हजार रुपयांचे दागीने देखील काढून दिले. संपुर्ण दागीने एका कापडात गुंडाळून त्याने घरी ठेवले होते. ते सर्व जसेच्या तसे काढून दिले. सराफा व्यावसायिक यांनी देखील ते ओळखले.
नंदुरबारातील सराफा दुकान फोडणारा आठ तासात ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 4:43 PM