नंदुरबार : सुवार्ता अलायन्स चर्चकडून 2004 मध्ये शहरात फ्रँकलीन मेमोरियल चर्चची उभारणी करण्यात आली होती़ गेल्या 14 वर्षापासून या चर्चच्या माध्यमातून येथील सभासद ािस्ती बांधव सामाजिक सलोखा जपत समाजासाठी योगदान देत आहेत़ सुवार्ता अलायन्स चर्चचे तत्कालीन अध्यक्ष प्रेमदास कालू यांच्या मार्गदर्शनाने 2004 मध्ये मिशन कंपाउंडमध्ये चर्चच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती़ केवळ सभासदांनी दिलेल्या देणगीच्या आधारे चार महिन्यात येथे देखणी वास्तू निर्माण करण्यात आली होती़ याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक व्याख्याने, रविवारी प्रार्थना, महिला आणि युवक-युवतींकडून कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येत़े वर्षभर साजरा होणा:या या कार्यक्रमांसोबतच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यही केले जात आह़े यांतर्गत आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, तांत्रिक शिक्षण देणारे दालन निर्माण करण्यात येऊन ािस्ती बांधवांसोबत सर्व जाती धर्माच्या गोरगरीब विद्याथ्र्याना शिक्षण दिले जात आह़े क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही चर्चच्या माध्यमातून करण्यात येत़े सुवार्ता अलायन्सचे अध्यक्ष डॉ़ राजेश वळवी यांच्या मार्गदर्शनात येथे नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आह़े मंगळवारी नाताळनिमित्त प्रार्थनेसह धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े खान्देशासह सातपुडय़ात सर्वप्रथम दी ािश्चन मिशनरी सोसायटीने कार्यास सुरुवात केली होती. 1890 ते 98 या दरम्यान भयंकर दुष्काळाच्या काळामध्ये खान्देशातील मरणासन्न गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी खलाम या प्रमुख सेवा केंद्रातर्फे मदत पाठविण्यात आली. या दरम्यान नंदुरबार शहरात छोटे रेल्वे स्थानकही बांधण्यात आले. यानिमित्ताने काही ब्रिटीश अधिकारी व कर्मचारी रेल्वेत नोकरीक करण्यासाठी याठिकाणी आले तेंव्हा एका छोटय़ा चर्चची त्यांना गरज भासली होती़ यातून पुढे नंदुरबारच्या रेल्वे क्रॉसिंगजवळ छोटे पाश्चिमात्य शैलीचे चर्च आणि घरे बांधण्यात आली. पुढे ही संस्था सुरु करणा:यांनी येथे मिशनरी म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली़ त्यांनी पुढे स्कॅन्डिीनेव्हीयन अलायन्स मिशन नावाच्या मिशनरी पाठविणा:या संस्थेला नंदुरबारचा धर्मप्रसार-प्रचाराचा कारभार पाहाण्यासाठी हस्तांतर केला़ साधारणपणे 1910-12 मध्ये स्कॅन्डिनेव्हीयन अलायन्स मिशनने पूर्वीच्या पंचायत समितीजवळची जागा घेत बांधकाम केल़े एसएएम या संस्थेने 2004 मध्ये शतक पुर्ण केल्यानंतर त्याचवेळी नवीन व सुसज्ज उपासनालय अर्थात चर्च बांधावे अशी संकल्पना पुढे आली. तेंव्हाच प्रकल्प हाती घेण्यात आला. रेव्हरंड ए.बी फ्रँकलीन या आद्य मिशनरींच्या नावाने या वास्तूचे नामकरण करण्यात आले. नवी इमारत त्रिकोण व पंचकोण भिंतीचा वापर करून बांधण्यात आली आहे. सध्या शहरात असलेली दोन्ही चर्च हे शहराच्या प्रगतीचे व समाजाच्या विकासाचे प्रतिक ठरत आहेत. या दोन्ही आधुनिक वास्तू खान्देशातील एकमेव असल्याचे सांगण्यात येत आह़े
फ्रँकलीन मेमोरियल चर्चच्या माध्यमाने जोपासला जातोय सामाजिक सलोखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:01 PM