मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडय़ा-पाडय़ांसह इतर भागातीलही 2400 अंगणवाडय़ा नवीन वर्षात सौर उज्रेने उजळणार आहेत. महावितरणतर्फे तसा विकास आराखडा अर्थात डीपीआर तयार करण्यात आला आहे. अंगणवाडय़ांप्रमाणेच ज्या शाळांर्पयत वीज पोहचलेली नाही अशा 340 शाळांना देखील सौर उज्रेद्वार वीज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि इतर कारणांमुळे अनेक गावांर्पयत वीज पोहचू शकली नाही. त्यामुळे शाळा आणि अंगणवाडय़ांचा प्रश्न तर लांबच आहे. ही बाब लक्षात घेता ज्या भागात वीज पोहचू शकत नाही अशा भागात सौर उज्रेचा पर्याय आता खुला करण्यात आला आहे. यामुळे अशा शाळा आता सौर उज्रेच्या प्रकाशात न्हाऊन निघणार आहेत.अडीच हजार अंगणवाडीजिल्ह्यात सात प्रकल्पात एकुण दोन हजार 434 अंगणवाडी आहेत. या अंगणवाडींमध्ये हजारो बालके दाखल आहेत. बालकांच्या शिक्षणासह अंगणवाडी कर्मचा:यांना पुरक पोषण आहार, कुपोषीत बालकांची काळजी, मातांसाठीचा पुरक पोषण आहार यासह इतर कामे पहावी लागतात. या सर्व कामांचे रेकॉर्ड लिखीत स्वरूपात या कर्मचा:यांना ठेवावे लागतात. परिणामी अनेकवेळा दप्तर गहाळ होणे, कागदपत्रे हरविणे असे प्रकार घडतात. ही बाब लक्षात अंगणवाडींमध्ये संगणक देवून ती माहिती त्यात संकलीत करण्याची बाब पुढे आली. परंतु अंगणवाडींना वीज पुरवठाच नसल्यामुळे ती बाबही बारगळली. आता सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा होणार असल्यामुळे संगणकांचा मार्गही मोकळा होणार आहे.डिजीटल लर्निगला मदतशहरी भागात खाजगी अंगणवाडय़ा, प्ले स्कूलमध्ये बालकांना डिजीटल पद्धतीद्वारा शिकवले जाते. त्यामुळे ग्रामिण भागातील अंगणवाडय़ांमध्ये देखील डिजीटल लर्निग असावे अशी मागणी पुढे आली होती. आता सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा होणार असल्यामुळे डिजीटल लर्निगचा मार्ग मोकळा होणार आहे.अनेक ठिकाणी कुडाच्या घरातदुर्गम भागातील अनेक अंगणवाडय़ा आजही कुडाच्या घरात भरतात. अंगणवाडय़ांना इमारत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकेच्या घरात, भाडय़ाच्या घरात किंवा ग्रामपंचायतीच्या खोलीत अशा अंगणवाडी चालतात. असे असतांना अशा ठिकाणी सौर उज्रेवर कशा व कोणत्या पद्धतीने वीज पुरवठा केला जाईल. ही बाब सहाजिकच समोर येते. जिल्ह्यात आजच्या स्थितीत जवळपास 600 अंगणवाडय़ांना इमारत नसल्याचे चित्र आहे. विकास आराखडा तयारजिल्ह्यातील अंगणवाडींना सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा करण्याचे आराखडा तयार करण्यात आला आहे. चार महिन्यांपूर्वी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुर्गम भागात भेट दिली असता त्यांनी तातडीने या कामाला प्राधान्य देण्याचे सुचीत केले होते. त्यानुसार महावितरणच्या अधिका:यांनी विकास आराखडा तयार केला आहे. येत्या वर्षभरात शासनाच्या मालकीच्या इमारतीत भरत असलेल्या अंगणवाडींना सौर पॅनेल पुरवून वीज पुरवठा दिला जाणार आहे.प्राथमिक शाळांचाही समावेशजिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार 393 शाळा इमारती आहेत. त्यापैकी एक हजार 53 शाळा इमारतींना वीज पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित 340 शाळा इमारतींना वीज पुरवठासाठी अनंत अडचणी आहेत. ही बाब लक्षात घेता अशा सर्वच 340 शाळा इमारतींना देखील सौर उज्रेद्वारा वीज पुरवठा करण्यात येणार आहे. त्याचाही विकास आराखडा तयार करण्यात आला असून तो देखील मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
नवीन वर्षात अडीच हजार अंगणवाडींमध्ये सौर उज्रेचा प्रकाश
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: January 01, 2018 12:32 PM