शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

फोन करताच, रुग्णवाहिका होईल हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 1:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  फोन करताच अवघ्या पाच ते दहा मिनिटात रुग्णवाहिका आश्रम शाळेत दाखल होईल. शक्य झाल्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  फोन करताच अवघ्या पाच ते दहा मिनिटात रुग्णवाहिका आश्रम शाळेत दाखल होईल. शक्य झाल्यास स्थानिक ठिकाणीच प्राथमिक उपचार होईल, त्यानंतर जवळच्या उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालयात विद्याथ्र्याला दाखल केले जाईल. हे शक्य होणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या अटल आरोग्य वाहिनी, आदिवासी जीवन दायीनी योजनेअंतर्गत मिळालेल्या 11 अत्याधुनिक रुग्णवाहिकांमुळे. त्यांचे लोकार्पण रविवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.नंदुरबार व तळोदा आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालविण्यात येणा:या 74 आश्रम शाळांमधील 30 विद्याथ्र्यासाठी ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, जि.प.अध्यक्षा रजनी नाईक, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, प्रकल्प अधिकारी वान्मती सी., विनय गौडा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रघुनाथ भोये आदी उपस्थित    होते.पालकमंत्री रावल म्हणाले, आश्रमशाळेत शिकणा:या विद्याथ्र्याना आता मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. विद्याथ्र्यानीही त्याचा सदुपयोग करावा. यात असलेल्या अत्याधुनिक सुविधांचा उपयोग विद्याथ्र्याना पुरेपूर होईल यासाठी आदिवासी प्रकल्पातील अधिकारी व कर्मचारी आणि नियुक्त केलेल्या कर्मचा:यांनी प्रय}शील राहावे. जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांमध्ये मोडत असल्यामुळे केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून घेण्यासाठी प्रय} राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.खासदार डॉ.हिना गावीत यांनी सांगितले, केंद्र शासनाच्या अर्थसहाय्य योजनेतून 11 रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यामुळे आश्रमशाळेतील विद्याथ्र्याचा आरोग्याचा प्रश्न सुटू शकणार आहे. जिल्ह्यातील 74 आश्रम शाळांच्या जवळ बीएसएनएल कडून 74 टॉवर केंद्र शासनाकडून मंजूर करून घेतले आहेत. यामुळे दुर्गम भागातील विद्याथ्र्यानाही आता इंटरनेट व मोबाईल वापराची चांगली संधी मिळणार आहे. त्याचा उपयोग जास्तीत जास्त शैक्षणिक उपक्रमांसाठी करावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमात आदिवासी इंग्रजी शाळा व शासकीय आश्रम शाळांमध्ये उत्कृष्ट काम करणा:या प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच शिक्षण व क्रिडा क्षेत्रात चांगले काम करणा:या विद्याथ्र्यांचा प्रमाणपत्र देवून जयकुमार रावल, डॉ.हिना गावीत, रजनी नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक विनय गौडा यांनी केले. आभार वान्मती सी. यांनी मानले. प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपकरणे, औषधी साठा आणि डॉक्टर व परिचर या रुग्णवाहिकेत 24 तास उपलब्ध राहतील. 108 या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास लागलीच रुग्णवाहिका संबधीत ठिकाणी पोहचणार आहे.सर्वच रुग्णवाहिकांना जीपीएस प्रणाली राहणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिका कुठे आहे. कुठे गेली याची माहिती सव्र्हरला मिळणार आहे. त्यामुळे या रुग्णवाहिकेचा दुरूपयोग होण्याचे टळणार आहे.