लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मागासवर्गीय महामंडळाची कर्जे माफ करावी व अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतर} पुरस्कार जाहीर करावा अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी समाज प्रबोधनासाठी राज्यभर संवाद यात्रा काढली आहे. त्याअंतर्गत ते शनिवारी नंदुरबारात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना ढोबळे यांनी सांगितले, शेतक:यांचे हजारो कोटींचे कर्ज माफ होते. परंतु जो शेतात राबतो. कष्ट करतो त्या उपेक्षीतांचे कर्ज माफ करण्याबाबत सरकार काहीही हालचाल करीत नाही. राज्यातील सर्वच मागासवर्गीय महामंडळांची कज्रे माफ करून या उपेक्षीत घटकाला दिलासा द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करण्यात आली आहे. यासाठी कुठलेही आंदोलन केले जाणार नाही. सनदशीर मार्गाने मागणी लावून धरली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.मातंग समाजासह मागासवर्गीयांसाठी अण्णाभाऊ साठे यांनी काम केले. या वंचीत घटकांची अंत्यप्रेरणा जागृत करण्याचे काम केले. आपल्या साहित्यातून त्यांनी जागृती केली अशा या महान व्यक्तीला त्यांचा कार्याचा गौरव म्हणून भारत रत्न जाहीर करावा अशी मागणी देखील त्यांनी केली.समाजातील वंचीत घटकांनी मुख्य प्रवाहात यावे यासाठी विविध माध्यमातून प्रय} केले जात आहेत. त्यासाठीच प्रबोधन संवाद यात्रा देखील काढण्यात आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी जावून आपण आर्थिक, शैक्षणिक बाबतीत मार्गदर्शन करीत आहोत. काटकसरीने 50 ते 100 रुपये बचत करून बँकांचे खाते जिवंत ठेवा, सैनिक, पोलीस भरती यासाठी समाजातील तरुणांनी तयारी करावी. आरोग्य, शिक्षण व बचतगट यामध्ये पुढाकार घ्यावा. आपली मुलं मिरवणुकीने पहिलीच्या शाळेत घालावी यासाठी आग्रही राहावे असे प्रबोधन या माध्यमातून करण्यात येत आहे. 1 ऑगस्टपासून वाटेगावहून ही यात्रा सुरू करण्यात आली असून 31 ऑगस्ट रोजी मुंबई चिरागनगर येथे तिचा समारोप होणार असल्याचेही लक्ष्मणराव ढोबळे यांनी सांगितले.
मागासवर्गीय महामंडळांची कर्ज माफ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 11:35 AM
समाज प्रबोधन संवाद यात्रा : लक्ष्मणराव ढोबळे यांची मागणी
ठळक मुद्दे 52 जातींना सवलतींबाबत काहीच माहिती नाही राज्यभरात एकटय़ा मातंग समाजात 300 संघटना आहेत. दलित समाजातील प्रमुख पाच पोटजातीमध्ये अशीच मतभेदाची दारूण अवस्था आहे. अनुसूचित जातीच्या 59 जातीमधील 52 उपेक्षीत जाती अशा आहेत की त्यांना सवलती कशाशी खातात हे माहितीसु