लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : ऊसाची लागवड करुन त्याला पाणी देता देताच कूपनलिका आटली, त्यानंतर कोरडा ऊस तरी कामी येईल अशी अपेक्षा असताना मातीमोल दरातच त्याची विक्री करावी लागल्याची वेळ आमलाड ता़ तळोदा येथील शेतक:यावर आली आह़े दुष्काळाची धग दिवसेंदिवस वाढत असल्याने तळोदा तालुक्यात पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ शेतक:यांवर आली आह़े आमलाड येथील सागर दिलीप पाटील यांनी त्यांच्या गट क्रमांक 54/1/2 या सहा एकर क्षेत्रात ऊसाची लागवड केली होती़ नोव्हेंबरपर्यंत ऊस तयार होण्याची अपेक्षा असल्याने त्यांच्याकडून संगोपनात कोणतीही कसर सोडली जात नव्हती़ पाणी पुरेल असा अंदाज असल्याने त्यांनी कारखान्यात ऊसाची नोंदणी केल्याची माहिती आह़े परंतू गत 20 दिवसांपूर्वी शेतातील कूपनलिका अचानक कोरडी झाली़ पाणीच येत नसल्याचे ध्यानी आल्यानंतर त्यांनी मोटार काढून खोली तपासली परंतू जमिनीच्या पोटात पाणीच नसल्याचे दिसून आल़े पाणी येणार अशी भाबडी अपेक्षा ठेवूनही पाण्याचा एक ठेंब कूपनलिकेत वाढला नाही़ परिणामी पाणी न मिळाल्याने 6 एकरावरील ऊसाचे पूर्ण पिक कोरडे झाल़े एकरी 23 हजार 500 रुपयांर्पयत खर्च करुनही ऊसाची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी सागर पाटील यांनी ऊस काढून टाकण्याचा निर्णय घेतला़ गावातील काहींनी त्यांना सल्ला देत पशुपालकांना चारा म्हणून ऊस विक्री करण्यास सांगितल़े परंतू उन्हामुळे पूर्णपणे कोरडा झालेल्या या चा:याला पशुपालकही अधिक दर देऊन न शकल्याने शेतक:याने नाईलाजाने मिळतील त्या दरात त्याची विक्री करुन खर्च काढण्याचा प्रयत्न करुन पाहिला़ तालुक्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारची स्थिती सध्या निर्माण झाली असून अचानक कूपनलिका आटत असल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े यापूर्वी तालुक्यात दुष्काळाची स्थिती उद्भवली नसल्याने सध्याच्या परिस्थितीचा सामना करावा कसा प्रश्न उपस्थित करण्यात येत आह़े एकरी 23 हजार रुपये खर्च करुन उभ्या केलेल्या ऊसाला पशुपालकांनी 1 हजार रुपये टन या प्रमाणे दर दिला होता़ यातून काही उत्पादन येऊन असे वाटत असताना केवळ सहा टन ऊसाचा चारा निघू शकला़ यामुळे शेतक:याना सहा हजार रुपये एवढीच रक्कम मिळाली़ शेतातून पाण्याअभावी कोरडा झालेला ऊस कापला जात असताना ते भावूक झाले होत़े
ऊस कोरडा झाल्याने चारा विकून लागवड खर्चही भागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 11:54 AM