लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ.राजेश कोळी, सचिव डॉ.रवींद्र पाटील, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.अर्जून लालचंदाणी उपस्थित होते. यावेळी डॉ.विजयकुमार गावीत यांनी स्व.जवाहरलालजी दर्डा यांच्या स्मृतींना उजाळा दिला. स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे योगदान, मंत्री म्हणून राज्यातील गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य आणि ‘लोकमत’च्या माध्यमातून केलेली वैचारिक पेरणी या कार्याचा त्यांनी गौरव केला. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत रुग्णांना रक्ताची मोठी गरज आहे. अशा स्थितीत ‘लोकमत’ ने राज्यभर घेतलेल्या रक्तदान शिबिरांमुळे अनेकांना जीवनदान मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जनकल्याण रक्तपेढी, लायन्स क्लब यांच्या संयुक्तविद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात संदीप वाणी, योगेश श्रीकृष्ण शास्त्री, सोमनाथ वायफळकर, जितेंद्र सूर्यवंशी, विश्वास सूर्यवंशी, प्रशांत पाटील, केतन पाटील, डॉ.कल्पेश पाटील, उज्ज्वल पाटील, शांताराम गावीत, हेमत पाटील, सोमनाथ कोकणी, वासुदेव माळी, सुधाकर पाटील, हितेश पाटील, रमाकांत पाटील, मनोज शेलार, संतोष सानप, भूषण रामराजे, सचिन जोशी, सुरेश पवार, दिनेश सावळे, विशाल सोनवणे, अंबालाल अहिरे यांच्यासह इतरांनी रक्तदान केले.यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, चंदर मंगलाणी, अमोल भारती आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी प्रकाश भोई, लॅब टेक्नीशियन खलील काझी, पुष्पा नायक, मदतनीस राजू वाघ, संजय सूर्यवंशी यांनी सहकार्य केले.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:33 PM