शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

क्रीडा विभागाचा जिल्हा युवा महोत्सव स्पर्धकांअभावी पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा क्रीडा विभागाने घोषित केलेल्या जिल्हा युवा महोत्सवाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा क्रीडा विभागाने घोषित केलेल्या जिल्हा युवा महोत्सवाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली आह़े मंगळवारी स्पर्धकच न आल्याने क्रीडा विभागाने ही स्पर्धा 7 डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आह़े जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने 29 नोव्हेंबर रोजी युवा महोत्सव घेण्याचे जाहिर केले होत़े या महोत्सवासाठी शहरातील डी़आऱ हायस्कूलला स्पर्धेचे यजमानपद देण्यात आले होत़े स्पर्धेसाठी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यानंतर स्पर्धकांचे अर्ज येणे अपेक्षित होत़े परंतू मुदतीत अजर्च न आल्याने विभागाने ही स्पर्धा 4 डिसेंबर रोजी घेण्याचे जाहिर केले होत़े परंतू मंगळवारीही स्पर्धक न आल्याने पुन्हा 7 डिसेंबर रोजी ही स्पर्धा घेण्याचे क्रीडा विभागाने कळवले आह़े दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्यासोबत संपर्क केला असता, त्यांनी स्पर्धेपूर्वी सर्व शाळा, महाविद्यालये, कलावंत यांना संपर्क करुन माहिती दिली होती़ महाविद्यालयांनी संघ पाठवण्याचे आश्वासन दिले होत़े परंतू ऐनवेळी एकाही संघाने नोंदणी केलेली नसल्याने ही स्पर्धा 7 रोजी होणार असल्याचे सांगितल़ेक्रीडा विभागाकडून लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, सितार, तबला, वीणा, मृदंग, बासरी, हार्मोनियम, गिटार वादन तसेच मणिपुरी नृत्य, ओडिसी नृत्य, भरतनाटय़म, कथ्थक, कुचीपुडी नृत्य आणि वक्तृत्व या 18 कला प्रकारात स्पर्धकांना नोंदणी करण्याचे कळवण्यात आले होत़े क्रीडा विभागाकडून स्पर्धेत स्पर्धक न आल्याचे कारण देण्यात आले असले तरी या महोत्सवाची जिल्ह्यात योग्य त्या पद्धतीने प्रसिद्धी करण्यात आलेली नसल्याचे कलावंतांचे म्हणणे आह़े धडगाव, आणि अक्कलकुवा तालुक्यातील  विद्याथ्र्याच्या कलापथकांना याबाबत माहिती नसल्याने स्पर्धा रखडल्याचे सांगण्यात आले आह़े उर्वरित कला प्रकारांबाबतही विभागाने प्रचार प्रसिद्धी केलेले नसल्याचे सांगण्यात आले आह़े येत्या 7 डिसेंबर रोजी ही स्पर्धा न झाल्यास नाशिक विभागीय युवा महोत्सवात नंदुरबार जिल्ह्याची गैरहजेरी लागणार असल्याने कलावंतांनी चिंता व्यक्त केली आह़े