नंदुरबार : अक्कलकुवा, नवापूर, शहादा आदी आगारातील एसटी बसचालकांचे सध्या मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत़ दुर्गम भागात पावसामुळे रस्त्यांची दैनावस्था झालेली आह़े त्यामुळे एसटी चालकांना ओबडधोबड रस्त्यांवरुन बस चालवतांना तारेवरची कसरत करावी लागत आह़े याबाबत अक्कलकुवा आगाराकडून विभागीय कार्यालयाकडे आपल्या व्यथा मांडण्यात आलेल्या आहेत़ अक्कलकुवा तालुक्यातील अमोनी, तुळाजा, दलेलपूर मार्ग तसेच रेवानगर आदी मार्ग, नवापूर तालुक्यातील रंगावली नदी डॅम जवळील परिसर, नागङिारी रस्ता, कोळदा नाला परिसर, तोरणमाळकडे जाणारा मार्ग, तसेच शहादा आगाराअंतर्गत येणारा, शेल्टी, शिंदे, झुरखेडा आदी मार्गावरील रस्त्याची दैनावस्था झालेली आह़े नवापूर तालुक्यात नुकतेच महापुराने थैमान घातले होत़े यात, तालुक्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ महापुरामुळे तीन दिवस एसटी बसेसदेखील बंद ठेवण्यात आलेल्या होत्या़ सोमवारपासून एसटी बसफे:या नियमित सोडण्यात आलेल्या आहेत़ असे असले तरी अनेक रस्ते ओबडधोबड झाले असल्याने या मार्गावरुन बस ने-आण करीत असताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, तळोदा तालुक्याचीसुध्दा आह़े अक्कलकुवा आगारातर्फे अनेक दुर्गम भागातील बसफे:या बंद करण्यात आलेल्या आहेत़ अमोनी, तुळाजा बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत़ त्या ऐवजी दलेलपूर मार्गे बसेस वळविण्यात आलेल्या आहेत़ रेवानगर मार्गे बसफेरी सुरु करण्याची मागणीकाही दिवसांपूर्वी रेवानगर मार्गे बसफेरी सुरु करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून अक्कलकुवा प्रशासनाला करण्यात आलेली होती़ त्यानुसार अक्कलकुवा आगाराकडून संबंधित मार्गाचे सव्रेक्षण करण्यात आले होत़े परंतु हा मार्ग वाहतुकीस योग्य नसल्याचे यातून दिसून आले होत़े त्यामुळे या मार्गावर बसफेरी होणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल़े फाटय़ापासून माघारी फिरतात बसेस्अक्कलकुवा तालुक्यातील अनेक ठिकाणी गावरस्ते ओबडधोबड झालेले असल्याने अनेक बसेस थेट गावात न जाता गावाच्या फाटय़ापासूनच माघारी फिरत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे ग्रामस्थांना फाटय़ापासून पुढे एक ते दीड किलो मीटर पायी जावे लागत असल्याचे सांगण्यात आल़े घाटांवरील रस्तेही धोकेदायकअक्कलकुवा, तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात अनेक घाटरस्ते आहेत़ या ठिकाणाहून वाहतूक करणे धोकेदायक आहेत़ त्यामुळे अक्कलकुवा आगाराकडून अशा घाट रस्त्याचेही सव्रेक्षण करण्यात आले होत़े सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला असल्याने साहजिकच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आह़े रस्त्यांवर दरडी कोसळत असल्याने मार्गावर सर्वत्र चिखल जमा होत असून रस्तेही ओबडधोबड होतात़ रात्रीच्या वेळी अशा मार्गावरुन वाहतूक करणे अत्यंत धोकेदायक ठरत असत़े त्यामुळे अशा परिस्थितीत घाटमार्ग अधिकच धोकेदायक ठरत असतात़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व आगार प्रशासन यांनी समन्वयातून यावर तोडगा काढावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े
रस्त्यांअभावी एसटी चालकांचे अतोनात हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:27 AM