लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एस.टी. बस व खाजगी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एस.टी. बसचालक जखमी झाला. पोलीस सूत्रांनुसार, धुळे-सुरत महामार्गावर सोनखांब ते पानबारा गावाच्या दरम्यान गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास सुरतकडे जाणारी जालना-सुरत बसला (क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 2880) धुळ्याकडे जाणा:या खाजगी लक्झरी बसने (क्रमांक जी.जे.03 बी.डब्ल्यू. 9596) धडक दिली. या अपघातात बस चालक आर.आर. शेख किरकोळ जखमी झाले. मात्र दोन्ही वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद झाली असून तपास हवालदार भीमसिंग ठाकरे करीत आहेत.