नंदुरबार : नंदुरबार येथील विविध आगारातील कर्मचा:यांना वितरीत करण्यात आलेल्या गणवेशाच्या मापात मोठा घोळ असल्याची माहिती आह़े त्यामुळे अनेक कर्मचा:यांची नव्याने मापे घेण्याची प्रयोजन एसटी महामंडळाकडून सुरु असल्याचे समजत़े ओबडधोबड मापामुळे अनेक कर्मचा:यांना गणवेश मिळूनही त्याचा वापर होत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आह़े जानेवारी 2018 पासून एसटी कर्मचा:यांच्या गणवेशात बदल करण्यात येऊन त्यांना नवीन गणवेशाच्या वाटपाला सुरुवात झाली़ परिवहन महामंडळाच्या इतिहारात पहिल्यांदाच अशा प्रकारे गणवेशात बदल होण्याची ही पहिलीच वेऴ यासाठी राज्य भरातील लाखो एसटी कर्मचा:यांना नवीन गणवेश वितरीत करण्यसाठी राज्य शासनाला साधारणत 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत होता़ परंतु एवढा पैसा खर्च करुनही एसटी कर्मचा:यांना नवीन गणवेशाचा वापर करता येत नसल्याची स्थिती निर्माण झालेली आह़े मापात घोळनंदुरबार येथील एसटी कर्मचा:यांना नवीन गणवेश देता यावा यासाठी साधारणत एप्रिल महिन्यात त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात आला होता़ शर्ट, पॅन्ट, बुट आदींचे माप घेण्यात आलेली होती़ त्यानंतरही ब:याच कालावधीर्पयत कर्मचा:यांना गणवेशासाठी प्रतीक्षा करावी लागली होती़ पहिल्यांदा बोटावर मोजण्या इतक्या कर्मचा:यांची गणवेश शिऊन घेण्यात आली होती़ परंतु शिऊन आलेला गणवेशच मापाचा नसल्याने कर्मचा:यांना नवीन गणवेश वापरणे शक्य झाले नाही़ त्या वेळी केवळ काहीच कर्मचा:यांची ही समस्या असल्याने याकडे दुर्लक्ष करण्यात आले होत़े परंतु आता जिल्ह्यातील विविध आगारातील बहुतेक कर्मचा:यांना गणवेश मिळालेले आहेत़ परंतु पुन्हा मापात घोळ झाल्याचे समोर आलेले आह़े कर्मचा:यांना मनस्तापअनेक कर्मचा:यांना ओबडधोबड मापाची शर्ट मिळालेली आह़े ज्या ठिकाणी 34 नंबरचे शर्ट हवे त्या ठिकाणी 32 नंबरचे शर्ट देण्यात आलेले आहेत़ असाच प्रकार पॅन्टचासुध्दा आह़े अनेकांच्या पॅन्टचे मापही चुकले असल्याच्या तक्रारी कर्मचा:यांकडून करण्यात येत आह़े मोठे शर्ट असल्यास त्यावर शिलाईचे काम करुन मापाचे करणे शक्य होत आह़े परंतु मुळातच एखाद्या शर्टाची साईज कमी असल्यास त्याला कसे परिधान करावे असा प्रश्न कर्मचा:यांकडून विचारण्यात येत आह़े पुन्हा गणवेशाची मापेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणवेशाच्या मापात घोळ झाल्याने अनेक कर्मचा:यांकडून याबाबत विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत़ त्यानुसार संबंधित कर्मचा:यांची पुन्हा मापे घेण्यात येणार असून त्यांना गणवेशाचे वितरण करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होतेय गणवेश वितरीत करण्या अगोदर कर्मचा:यांकडून गणवेशाची मापे लिहून घेतली होती़ या साठी अजर्ही भरुन घेण्यात आलेला होता़ त्यामुळे मापानुसार गणवेश येणे अपेक्षीत होत़े परंतु ओबडधोबड मापाचे गणवेश शिऊन ते कर्मचा:यांना वितरीत केल्याने कर्मचा:यांकडून नाराजीचा सूर उमटत आह़े आधीच महामंडळाने तब्बल 7 महिन्यांनी गणवेशाचे वितरण केल़े परंतु त्यातही अनेक गणवेशांची मापे चुकीची असल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आह़े अनेकांना गणवेशाची प्रतीक्षासहा ते सात महिने उलटूनही नंदुरबारातील अनेक कर्मचा:यांना अद्याप नवीन गणवेश मिळालेले नाहीत़ त्यामुळे त्यांना अद्याप गणवेशाची प्रतीक्षा कायम आह़े याबाबत धुळे येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला असताना साधारणत 15 ऑगस्टर्पयत सर्व कर्मचा:यांना गणवेश व बुटांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल़े
एसटी कर्मचारी गणवेशाच्या मापात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 1:29 PM