नंदुरबार : तलाठीला मारहाण प्रकरणातील संशयीतास अटक होत नाही तोर्पयत तलाठींनी लेखनीबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत जिल्हाधिका:यांना निवेदन देवून आपली भुमिका तलाठी संघाने स्पष्ट केली.नंदुरबार तहसील कार्यालयात 9 जुलै रोजी खोंडामळी येथील तलाठी बालाजी बिडगर यांना कलमाडी येथील एकाने मारहाण करून शिविगाळ केली होती. याबाबत संबधिताविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात 10 जुलै रोजी लेखी निवेदन देवून लेखनीबंदची पूर्वकल्पना देण्यात आली होती. परंतु गुन्हा दाखल होऊन आठवडा उलटला तरी अद्याप संशयीतास अटक करण्यात आलेली नाही. याघटनेसंदर्भात तलाठींमध्ये तीव्र नाराजीची भावना असून भितीचे वातावरण देखील आहे. संशयीतास जोर्पयत अटक होत नाही तोर्पयत लेखणीबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय तालुका तलाठी संघाने घेतल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिका:यांशीही चर्चा करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष सी.टी.नाईक, सचिव ए.व्ही.रघुवंशी, बालाजी बिडगर, एन.बी.मराठे, आर.डी.गांगुर्डे, बी.डी.धनगर, एम.डी.गावीत आदींसह सदस्यांच्या सह्या आहेत.
नंदुरबार तालुक्यातील तलाठींची लेखनीबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:37 PM