यावेळी बाजार समितीच्या प्रांगणात व्यापारी, शेतकरी, हमाल-मापाडी उपस्थित होते. कापूस खरेदी सुरू होत आहे असे कळताच बाजार समितीमध्ये वाहनांची वर्दळ सुरू झाली. यामध्ये सर्वप्रथम कोठली (महाराष्ट्र) येथील शेतकरी प्रशांत फकिरा यांच्या कापसाला प्रथम मुहूर्त सहा हजार ५२० रुपये प्रति क्विंटल इतका भाव देण्यात आला. बाजार समितीमध्ये एकूण आठ वाहने आली होती व कापसाची आवक चांगली होती. यावेळी खेतिया कॉटन असोसिएशनचे अध्यक्ष महिपाल नाहर, संचेती कोटेक्सचे दिलीप संचेती, आदित्य संचेती, मित्तल ग्लोबल कॉटन कमल अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, प्रांशय अग्रवाल, यश अग्रवाल, नानेश इंडस्ट्रीजचे सुनील जैन, आशिष जैन, गोकुळ जिनिंगचे प्रवीण शाह, अंकित शाह, दिविल कॉटनचे पंकज अग्रवाल, बालाजी कॉटनचे गजानन मालवीय, अमित मालवीय, हितेश सुराणा, नाकोडा एग्रो टेकचे राजेश नाहर, अमित नाहर, सौरभ नाहर, गोवर्धन कोटेक्सचे दीपेश हरसोला, प्रीतेश हरसोला, दुर्गेश्वरी जिनिंगचे भिकमचंद जोशी, अंकीत तिवारी, सत्यम जिनिंगचे मुकेश टाटिया, कमलेश मुकेश टाटिया आदी कॉटन व्यापारी व शेतकरी उपस्थित होते.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात राज्यांतील शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी खेतिया बाजारपेठ विश्वासू बाजार पेठ म्हणून प्रसिद्ध आहे. शेतकरी खेतिया बाजार समितीत कापूस विक्रीसाठी मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे खेतिया बाजार समितीच्या कापूस खरेदीच्या भावाकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष असते.