लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : डाब (मोरीराही) ता़ अक्कलकुवा येथील देवाची होळी सोमवारी पहाटे पेटवण्यात आली़ यावेळी बावा, बुध्या, मोरखी यांनी जोरदार नृत्य करत होळी मातेला वंदन केल़े देवाची होळी पेटल्यानंतर सातपुडय़ात ठिकठिकाणी ढोल बिरीचे स्वर घुमू लागले असून सातपुडय़ात होलिकोत्सवाला सुरूवात झाली आह़ेसोमवारी होलिकोत्सवाचे औचित्य साधून धडगाव येथे पारंपरिक भोंग:या बाजाराचे आयोजन करण्यात आले होत़े भोंग:याचे मानकरी पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या निवासस्थानापासून मिरवणूक काढून भोंग:या बाजाराला सुरूवात करण्यात आली़ विश्रामगृह हनुमान मंदिर मार्गाने धडगाव पोलीस ठाणे, रूपसिंग तडवी यांचे निवासस्थान, फॉरेस्ट कार्यालय, पाटीलबाबा चौक या मार्गाने मेनरोडवरील मुख्य बाजारपेठेतून पुन्हा पोलीस पाटील यांच्या घराकडे परतली़ या मिरवणूकीत पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधवांनी जोषात नृत्य केल़े भोंग:या बाजारात पारंपरिक पोषाखातील महिला, युवती, युवक, पुरूष आणि ज्येष्ठ सहभागी झाले होत़े सकाळी 11 वाजेपासून प्रारंभ झालेल्या या मिरवणूकीचा समारोप दुपारी तीन वाजता पोलीस पाटील भिमसिंग पराडके यांच्या निवासस्थानी करण्यात आली़शोभायात्रेत महेश पराडके, शिवाजी पराडके, बाज्या पराडके, खेमा पराडके, जामसिंग पराडके, रूपसिंग तडवी, पोलीस निरीक्षक संजय भामरे यांच्या तालुक्याच्या विविध भागातून आलेले मान्यवर सहभागी झाले होत़े सकाळपासून बाजारपेठेत गूळ, दाळ्या, संत्रा, हारकंगन, होळी पूजनासाठी लागणारे साहित्य, खोबरे, शोभेचा कागद आणि कपडे खरेदी करण्यासाठी शेकडो आदिवासी बांधव दुर्गम भागातून धडगाव येथे आले होत़े बाजारपेठेत स्थानिक व्यापा:यांसोबतच शहादा आणि अक्कलकुवा येथूनही फळ व्यापारी सहभागी झाले होत़ेगेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धडगावच्या भोंग:या बाजारात मोठय़ा प्रमाणावर उत्साह दिसून आला़ यातून दिवसभरात हजारो रूपयांची उलाढाल झाली़
होलिकोत्सवाला सुरूवात : धडगावला भरला पारंपरिक भोंग-या बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:16 PM