शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
2
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
3
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
4
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
5
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
6
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
7
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
8
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

डेंग्यू रोखण्यासाठी किटकशास्त्रीय सव्र्हेक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 12:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे किटकशास्त्रीय सव्र्हेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. विविध उपाययोजना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य विभागातर्फे किटकशास्त्रीय सव्र्हेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे. विविध उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून त्याद्वारे डेंग्यूचे रुग्ण शोधण्याची मोहिम सुरू आहे.जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण नंदुरबार शहरासह अनेक गावांमध्ये आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू सदृष्य आजारांचे रुग्ण देखील मोठय़ा संख्येने उपचार घेत आहेत. ही बाब लक्षात घेता आरोग्य विभागाने गांभिर्याने  घेवून तातडीने उपाय योजनांना सुरूवात केली आहे. आरोग्य विभागातर्फे सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये संपर्क करून डेंग्यू रुग्णांची माहिती घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याशिवाय विविध उपाययोजना देखील सुरू करण्यात आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. उपाययोजनांमध्ये जलद ताप रुग्ण सव्र्हेक्षण, डेंग्यूसाठी रक्त जल नमुने गोळा करणे, रक्त जल नमुने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविणे, डेंग्यू रुग्णांवर लागलीच उपचार करणे, किटकशास्त्रीय सव्र्हेक्षणास लागलीच सुरुवात करण्यात आली आहे. कंटेनर सव्र्हे देखील करण्यात आला आहे. अबेट अर्थात टॅमीफॉसचा वापर सुरू करण्यात आला आहे. याशिवाय पालिकेतर्फे धुरफवारणी करण्यात येत आहे. गटारी, साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी अळीनाशक औषधी फवारणी करण्यात येत आहे. लोकांमध्ये किटकजन्य आजारांबाबत जनजागृती देखील करण्यात येत आहे. नागरिकांनी देखील काळजी घ्यावी. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण नियमित स्वरूपात आढळून येत आहेत. ऑगस्ट, सप्टेंबरनंतर वाढ होतांना दिसते. काही भागात अतिपाऊस, काही भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य, वाढते शहरीकरण, स्थलांतराचे पश्न, विविध विकास कामे या व अशा कारणांमुळे डेंग्यूचे प्रमाण विविध भागात अधीक दिसून येत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी डेंग्यूचा प्रसारक डास रोखण्यासाठी नागरिकांनी देखील काळजी घेणे आवश्यक आहे. या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात होते. त्यामुळे घरातील पाण्याचे साठे झाकुन ठेवावे. आठवडय़ातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.