लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय शाळेतील समस्या आणि प्रश्नांची माहिती घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या सात सदस्यीय पथकाने गुरुवारी शाळेला भेट दिली. शाळेतील विविध सुधारणांबाबत त्यांनी प्रशासनाला सुचना दिल्या. शाळेतील अनागोंदीबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल समितीने घेतली. दरम्यान, समिती शुक्रवारी तोरणमाळ येथे भेट देणार आहे.राज्यातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा तोरणमाळ येथे मंजुर करण्यात आली आहे. या ठिकाणी जागा व इमारत उपलब्ध नसल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही शाळा नंदुरबारातील एकलव्य इंग्रजी मिडियम स्कूलमध्ये सुरू करण्यात आली आहे. परंतु या शाळेत जून महिन्यापासून आतार्पयत अनेक असुविधा व समस्या होत्या. जेवनाचे बील न देणे, विद्याथ्र्याना स्वेटर, ब्लँकेट, बेड न पुरविणे, कंत्राटी कर्मचा:यांना मानधन न देणे यासह इतर समस्यांबाबत ‘लोकमत’ने दोन वेळा सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची राज्याच्या शिक्षण संचालकांनी दखल घेवून समस्या तातडीने सुटाव्या यासाठी सुचना दिल्या होत्या. शिवाय गुरुवारी सात सदस्यीय समितीने देखील भेट दिली. त्यात विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ.सुनील मगर, मंत्रालयातील ओएसडी प्राची साठे, उपसंचाल विकास गरड, सिद्धेश वाडकर, मनिषा यादव, नूतन मघाडे आदींचा समावेश होता. जिल्हाधिकारी डॅा.एम.कलशेट्टी, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, डॉ.कांबळे, डॉ.युनूस पठाण हे देखील यावेळी उपस्थित होते. समितीने विद्याथ्र्याशी संवाद साधला. विविध समस्या व प्रश्न जाणून घेतले. विद्याथ्र्याना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्या. जेवढेही बील थकीत असतील ते तातडीने अदा करण्यात यावे. तोरणमाळ केंद्राअंतर्गत आणखी तीन शाळा बंद करण्यात आल्या, त्या शाळेतील विद्याथ्र्यानाही सामावून घेण्याच्या सुचना देण्यात आल्या. शाळेचे कामकाज यापुढे शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी हे पहातील असेही समितीने स्पष्ट केले. समिती शुक्रवारी तोरणमाळ येथे भेट देणार असून तेथे शाळा बांधकामासाठी मिळालेली जागा आणि इतर बाबींची पहाणी करणार आहेत.
राज्यस्तरीय समितीने घेतला नंदुरबारातील आंतरराष्ट्रीय शाळेतील सुविधांचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 1:07 PM