नंदुरबार : शेतकरी हाच वारकरी, त्याची आत्महत्या ही चटका लावणारी ठरते, शेतकरी आत्महत्या का करतो, याचा शोध घेत सतांनी ‘लोकपिठावरुन’ सतत प्रबोधन करुन शेतक:यांना समंजस कराव़े आत्महत्या थांबवण्यासाठी शासनानेही योग्य ती मदत करुन शेतक:यांचे पुनवर्सन करावे असे चिंतन राज्यस्तरीय वारकरी संमेलनात गुरुवारी करण्यात आल़े नंदुरबार शहरातील माळीवाडा भागात रामकृष्ण नगरीत 21 डिसेंबरपासून राज्यस्तरीय वारकरी संमेलनास सुरुवात झाली होती़ अखिल भारतीय वारकरी मंडळाने आयोजित केलेल्या या संमेलानाचा शुक्रवारी समारोप होणार आह़े तत्पूर्वी गुरुवारी सकाळी संतसंमेलन घेण्यात येऊन विविध ठराव करण्यात आल़े या ठरावांनंतर उपस्थित संत, मंडळाचे पदाधिकारी, वारकरी आणि शेतकरी यांच्या उपस्थितीत या ठरावांवर चर्चा होऊन दीर्घ चिंतन झाल़े व्यासपीठावर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, देव गोपाळ शास्त्री महाराज, संत बाबाजी महाहंस महाराज आडगावकर, संतोषनंद शास्त्री महाराज, अनिल महाराज वाळके, अविनाश जोशी महाराज, विजय महाराज जाधव, नामदेव शास्त्री महाराज टेंभेकर, संध्याबाई माळी, भिला खोरीकर, अंबादास महाराज कोडदेकर, समाधान महाराज आदी उपस्थित होत़े प्रास्ताविक अनिल महाराज वाळके यांनी केल़े सूत्रसंचालन ज्ञानेश्वर महाराज माळी तर आभार पावबा महाराज अक्राळेकर यांनी मानल़े पसायदानाने समारोप झाला़ शासनाकडून दरवर्षी केवळ 60 भजनी कलावंतांना अनुदान दिले जात़े ही संख्या वाढवून 300 करण्यात यावी तसेच पेन्शनमध्ये वाढ करावी़वारक:यांना आरोग्य व आपत्कालीन मदत देण्यात यावी़ शेतकरी-वारकरी हा प्रश्न शासनाने गांभिर्याने घेऊन शेतक:यांची मानसिक स्थिती सुधारण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम हाती घ्यावा़गावागावात संतांच्या सहाय्याने व्यसनमुक्ती विषयावर प्रबोधन करण्यात याव़ेबेटीबचाव, पर्यावरण, कुपोषण, महिला सक्षमीकरण या विषयांना शासनाने प्राधान्य द्याव़ेअखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सहाय्याने राज्यात वारकारी भजन, तत्त्वज्ञान, संत साहित्याचे शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात यावी़अध्यात्म विज्ञान यांची समीक्षा करत सांगड घालून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करावा़समाजात धर्मनिष्ठेबाबत प्रबोधन करण़ेवारक:यांमध्ये शासनाच्या विविध योजनाची माहिती होऊन त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण़ेतिर्थक्षेत्रांची माहिती सामान्यांर्पयत पोहोचवण्यासाठी शासनाने प्रयत्न कराव़े गुजरात राज्यात अखिल भारतीय मंडळाने कार्य करुन वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य पोहोचवाव़े
राज्यस्तरीय वारकरी संमेलनात ‘शेतकरी आत्महत्येवर चिंतन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 1:14 PM