नंदुरबार : महाराष्ट्र भाजप शिक्षक आघाडीतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांना देण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नंदुरबार लोकसभा प्रभारी राजेंद्रकुमार गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाच्या तारखा तत्काळ घोषित कराव्यात, १ नाव्हेंबर २००५पूर्वी अंशत: अनुदानित शाळांमध्ये नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची बंद केलेले भविष्य निर्वाह खाती तत्काळ सुरु करावीत, १ तारखेला वेतन मिळण्याबाबत व वेतनाला विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करावे, शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरु करावी, पायाभूत पदे मंजूर करावीत, आदी मागण्यांचा समावेश आहे. या निवेदनावर भाजप शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बी. डी. पाटील, बी. बी. नमाईत, बी. वाय. पाटील, व्ही. यू. घुगे, बी. जे. जावरे आदींच्या सह्या आहेत.