नंदुरबार : शहादा आणि नंदुरबार तालुक्यात लोकसहभागातून 40 गावांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे जिल्ह्यातील पाणी साठवण क्षमता ही 91 कोटी 34 लाख लीटरने वाढणार असल्याचा दावा भारतीय जैन संघटनेने केला आह़े गेल्या महिनाभरापासून शहादा 36 तर नंदुरबार तालुक्यातील 48 गावांमध्ये जलसंधारणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले होत़े यापैकी नंदुरबार 19 व शहादा तालुक्यातील 22 गावांनी लोकसहभागातून सिसीटी, कंपार्टमेंट, बंडींग, गावतलाव खोलीकरण आदी कामे पूर्ण केली होती़ या लोकसहभागाला मदतीची लोड देत भारतीय जैन संघटनेच्यावतीने 4 हजार 671 तास पोकलँड व 7 हजार 753 तास जेसीबी मशिन उपलब्ध करून देण्यात आले होत़े 9 एप्रिल ते 22 मे या दरम्यान झालेल्या कामांमुळे साठवण क्षमता वाढून तेवढाच गाळ काढण्यात आला आह़े या कामांचे मूल्यमापन येत्या काळात होणार असून यातील काही गावे ही स्पर्धात्मक यशात पुढे येणार असल्याचे सांगण्यात आले आह़े यासंदर्भात बिजेएसचे अध्यक्ष डॉ़ कांतीलाल टाटिया यांनी रविवारी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली़ ते म्हणाले की, विविध गावांमध्ये गेल्या महिन्यात राबवण्यात आलेल्या या कामांसाठी बीजेएसच्या 1 हजार कार्यकत्र्यानी परिश्रम घेतल़े नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ़ एम़कलशेट्टी यांनी इंधनासाठी लोकसहभाग देणा:या गावांना दीड लाख रूपये उपलब्ध करून दिल्याने जनसंधारणाच्या कामांना अधिक वेग आला होता़ येत्या काळात पाऊस आल्यानंतर या कामांची क्षमता स्पष्ट होणार असली तरी मूल्यमापनानुसार या कामांना यश आल्याचे सांगण्यात येत आह़े शहादा तालुक्यातील नवानगर, मंदाणे, भुलाणे, भोंगरा, लंगडी, मानमोडय़ा, काकर्दे, सोनवद, कौठळ, मोहिदे तर्फे शहादा, गोगापूर, डामळदा, निंभोरा, धांद्रे बुद्रुक, बोराडे, दुधखेडा, अनरद, शोभानगर, वाडी पुनर्वसन,बामखेडा तर्फे हवेली, खेड दिगर आणि वडगाव या गावांमध्ये वॉटर कपअंतर्गत विविध कामे झाल्याचे डॉ़ कांतीलाल टाटिया यांनी सांगितल़े नंदुरबार तालुक्यातील न्याहली, दहींदुले बुद्रुक, ठाणेपाडा, आसाणे, भादवड, धमडाई, काकरदे, दुधाळे, वाघाडी, शिरवाडे, वडझाकण, उमर्दे खुर्द, पळाशी, शिंदे, पाचोराबारी आणि अजेपूर या गावांमध्ये ग्रामस्थांचा सहभाग वाढून कामे पूर्ण झाली होती़यासोबतच जिल्हाधिकारी यांनी पथराई, खोडसगाव, समशेरपूर, वावद, उमर्दे बुद्रुक, लहान शहादे, टाकली पाडा, कं्रढे ता़ नंदुरबार, अलखेड, शहाणा, काथर्दे खुर्द, पुसनद ता़ शहादा, सिंगसपूर, तळवे, तळोदा पालिका ता़ तळोदा तसेच मुंगबारी याठिकाणी जलसंधारणाची कामे सुचवली होती़ याठिकाणीही खोदकामासाठी जैन संघटनेकडून जेसीबी आणि पोकलँड मशीन उपलब्ध करून देण्यात आले होत़े
91 कोटी लीटरने वाढणार साठवण क्षमता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:59 AM