ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.4- जिल्ह्यातील अनेक भागात शनिवारी वादळवा:यासह पाऊस झाला. काही भागात पावसाचा जोर जास्त होता तर काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. शहादा, प्रकाशा, नंदुरबार तालुक्यातील मांजरे परिसरात मोठे नुकसान झाले. दरम्यान, सैताणे व खेतिया येथे शुक्रवारी रात्री वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
शहादा शहरासह तालुक्यातील अनेक भागात शनिवारी दुपारी पाऊस झाला. वादळवारा देखील होता. त्यामुळे एकच धावपळ उडाली. साधारणत: 20 ते 25 मिनिटे झालेल्या पावसाने बाजार समितीत ठेवलेले धान्य भिजले. आधीच शेतकरी संपामुळे आवक कमी असल्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. शहरातील एका शाळेच्या आवारात विवाह समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तेथील मंडप वादळवा:यामुळे उडाला, व:हाडी मंडळींनी वेळीच सावधानता बाळगल्याने कुणी जखमी झाले नाही. याच परिसरात झाडे देखील उन्मळून पडले होते.
सारंगखेडा ते निमगुळ दरम्यान देखील वादळवा:यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे शहादा-दोंडाईचा रस्त्यावरील वाहतुक विस्कळीत झाली होती.
मांजरे परिसरात नुकसान
नंदुरबार तालुक्यातील मांजरे परिसरासह पूर्व भागात दुपारी वादळामुळे मोठे नुकसान झाले. अनेक घरांचे पत्रे उडाले. विजेच्या तारा तुटल्या त्यामुळे एकच धावपळ उडाली. जुने वृक्ष शाळेच्या भिंतीवर पडल्याने नुकसान झाले. याशिवाय काकर्दे, सिंदगव्हाण परिसरात देखील वादळवा:यासह पाऊस झाला.