शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात? 
2
“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?
3
"यूपी से है, मराठी नहीं आती..."; मुंबई मेट्रोमध्ये परप्रांतीय कर्मचारी भरतीवरून वाद
4
आमच्या मतदारांची नावे यादीतून वगळण्याचं भाजपा-शिंदे सेनेचं षडयंत्र; मविआचा आरोप
5
"उद्धव ठाकरेंना 'मविआ'समोर कटोरा घेऊन फिरावं लागतंय", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका
6
जनरल तिकीट काढल्यानंतर तुम्हाला किती तासांनी ट्रेन पकडावी लागेल? जाणून घ्या, नियम...
7
अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?
8
९ वेळा MA, २ वेळा PhD... आता आठव्यांदा UGC NET; परीक्षा क्रॅक करण्याचा अनोखा रेकॉर्ड
9
झारखंडचं जागावाटप ठरलं, महाराष्ट्राचं कधी?; NDA मध्ये भाजपा लढणार सर्वाधिक जागा
10
रात्रीस खेळ चाले! अंतरवाली सराटीत फेऱ्या वाढल्या; रात्री १ वाजता जरांगेंना भाजपा नेते भेटले
11
Diwali 2024: दिवाळीत 'या' वस्तूंची चुकूनही करू नका खरेदी; लक्ष्मी ऐवजी अलक्ष्मी येईल घरी!
12
आरोपीचा पक्ष कोणता हे पाहू नका, त्याला अटक करा; ठाणे प्रकरणावर राज ठाकरे संतापले
13
खुर्चीवर विराजमान होताच मुख्यमंत्री सैनी यांचा मोठा निर्णय; 'या' रुग्णांना मिळणार मोफत उपचार!
14
अस्सल मुंबईकर! फिल्डिंगमध्ये चेंडू लागल्याने मैदानाबाहेर गेला; बॅटिंगला मात्र वेळेत हजर झाला!
15
तरुणीच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी सापळा रचला, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर हनीट्रॅपमुळे सापडला
16
IND vs NZ : रचिनची सेंच्युरी अन् साउदीची फिफ्टी; न्यूझीलंडचा पहिला डाव ४०० पार
17
“४ नोव्हेंबरला मोठा स्फोट होणार, मविआ-महायुतीचे एन्काउंटर करणार”; परिवर्तन महाशक्तीचा दावा
18
विक्रोळीत भाजी विक्रेत्यांकडून माजी महापौरांना धक्काबुक्की; दत्ता दळवींचे वॉर्ड ऑफिसवर आरोप
19
“भाजपाची बिष्णोई गँग त्रास देते, कसे लढायचे आम्हाला चांगले माहिती आहे”; संजय राऊतांची टीका
20
Diwali 2024: दिवाळीच्या दिवसात कशी ओळखावी खाद्यपदार्थातली भेसळ? करा 'हे' सोपे प्रयोग

वादळ टळले, पाऊस कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2020 12:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चक्रीवादळ जिल्ह्याला टाळून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु रात्री १० वाजेनंतर जोरदार वाऱ्यांसह पावसाची रिपरिप सुरू होती. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी रस्ते पाण्यात गेले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. जिल्ह्यात कुठेही जीवीत हाणी झाली नाही. दरम्यान, गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.जिल्हा प्रशासनाने चक्री वादळाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात सर्वत्र दक्षता घेतली होती. हवामान विभागाने नंदुरबारला रेड अलर्ट देखील दिला होता. त्यामुळे बुधवारी दुपारी ३ वाजेनंतर बाजारपेठा बंद करण्यात आल्या होत्या. नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना सुरक्षीत स्थळी देखील हलविण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत प्रशासन दक्ष होते. परंतु वादळाने दिशा बदलल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. परंतु अती पावसामुळे नुकसान होऊ नये यासाठी मात्र दक्षता घेण्यात आली. तरीही शेती पिकाचे पावसामुळे नुकसान झाले. रस्तेही पाण्यात गेले. वीज पुरवठा अनेक भागात १० ते १२ तास खंडित होता.वादळ नाही, पण पाऊस बरसलावादळ आले नाही , परंतु पाऊस बºयापैकी बरसला. रात्री ९ वाजेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. रात्री ११ वाजता हवेचा वेग वाढून पावसाचाही वेग वाढला होता. हवेच्या वेगामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्यामुळे विजेच्या ताराही तुटल्या. मोठी वित्त हाणी मात्र कुठेही झाली नाही. पावसाची रिपरिप पहाटे दोन ते अडीच वाजेपर्यंत सुरूच होती. नंतर मात्र पावसाचा वेग मंदावला. सकाळी पावसाने विश्रांती घेतली. दिवसभर मात्र ढगाळ वातावरण कायम होते.नवापूर, नंदुरबारात पाऊसगुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास नवापूर व नंदुरबार तालुक्यातील अनेक भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. नंदुरबारात सायंकाळपर्यंत रिपरिप सुरू होती. त्यामुळे जनजीवनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. तालुक्याच्या पश्चिम पट्टयात पावसाचा जोर बºयापैकी होता.१२ तास वीज खंडितनंदुरबार तालुक्यासह अनेक भागात बुधवारी रात्रीपासून ते गुरुवारी पहाटेपर्यंत तब्बल १० ते १२ तास वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे आणि वादळामुळे काही मुख्य वीज वाहिनीचे नुकसान झाल्याने ही समस्या निर्माण झाली होती. सकाळी दुरूस्ती करून ८ वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात वीज कंपनीला यश आले. त्यामुळे ग्रामिण भागात संपुर्ण रात्र वीज पुरवठा खंडित राहिला. वीज कंपनीने मान्सूनपूर्व दुरूस्ती करून उपाययोजना देखील केलेल्या असतांनाही वाळवाच्या पावसातच वीज कंपनीच्या तयारीचे आणि नियोजनाचे वाभाडे निघाल्याचे दिसून आल्याने नागरिकांनी नाराजीही व्यक्त केली.पंचनामे करण्याच्या सुचनावादळ आणि पावसामुळे शेती आणि घरांचे नुकसान झाले असल्यास तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतात सध्या फळ पिकांमध्ये केळी, पपई आहे.त्यांचे नुकसान झाले. याशिवाय सातपुड्यात आंब्याचेंही मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यात वादळामुळे काही घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. पंचनामे पुर्ण झाल्यावर नुकसानीचा एकुण अंदाज कळणार आहे.निर्माणाधिन रस्त्यांची दुरावस्थाजिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. निर्माणाधिन असलेल्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने गाळ व चिखल निर्माण झाला होता. त्यामुळे रहदारीवर परिणाम झाला होता. चिखलातून वाहनचालकांना वाट काढावी लागत होती. कोळदा-खेतिया रस्ता, समशेरपूर-करणखेडा, असलोद-वैजाली रस्ता यासह इतर रस्त्यांची कामे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्या कामांवर परिणाम झाला आहे.

बुधवारी दिवसभर व पहाटेपर्यंत झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्हा जलमय झाला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद नंदुरबार तालुक्यात ५९ मि.मी.इतकी झाली. त्या खालोखाल शहादा तालुक्यात ४८, नवापूर तालुक्यात ४०, तळोदा तालुक्यात ३५, अक्कलकुवा तालुक्यात २८ तर धडगाव तालुक्यात सर्वात कमी १३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा असल्याने जिल्ह्यातील काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.