नंदुरबार,दि.3 : आपसातील वादावरून सुरू असलेली मारहाण सोडविण्यास गेलेल्या लोकांसह पोलिसांवरही दगडफेक केल्याप्रकरणी बंधारहट्टी भागातील 32 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी रात्री ही घटना घडली.
शहरातील बंधारहट्टी भागात आपसातील वादावरून मारहाण सुरू असल्याची माहिती पोलिसांसह परिसरातील लोकांना कळाली. हाणामारी करणारे हे हातात लोखंडी सळई, लाठय़ा, काठय़ा, लोखंडी पाईप यांचा वापर करीत होते. त्यामुळे हवालदार विशाल रामचंद्र बोरसे यांच्यासह काहीजण ती भांडण सोडविण्यासाठी गेले. त्यावेळी जमावाने त्यांच्यावरच चाल केली. याबाबत विशाल रामचंद्र बोरसे यांच्या फिर्यादीवरून जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात दिनेश भील, बबन पाडवी, विमल सुरेश पाडवी, चंदा मनोज भिल, सुमनबाई बबन पाडवी, सोनी सुरेश ठाकरे, अशोक विक्रम ठाकरे, कमाबाई विक्रम ठाकरे, अरुणा भु:या भिल, अनिता लोहार, विजय कथ्थू पवार, विकी सुरेश पाडवी, दिनेश रामू जाधव, कैलास अशोक भिल, अशोक सो:या ठाकरे, कृष्णा विन्या चौधरी, सागर बारकू पवार, घंटू हाबडय़ा, मंटू हाबडय़ा, काल्या विना चौधरी, भिमसिंग पवार, सोचाबाई रतन पवार, सावन रतन पवार, भु:या रतन पवार, नबू अशोक भिल, बुधा रतन पवार, मुन्नी भिमसिंग पवार, भोला जतन पवार, कमलेश जतन पवार, लताबाई राजकुमार भिल, नंदाबाई संजू ठाकरे, नबूबाई विरसिंग भिल सर्व रा.बंधारहट्टी यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.