शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:32 AM

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीकरिता राजकीय पक्षांसह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे ...

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीकरिता राजकीय पक्षांसह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीबाबत संनियंत्रण समितीच्या आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी कल्पना नीळ-टुबे, अधीक्षक अभियंता (विद्युत) अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता वाय. बी. कुळकर्णी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे

कटाक्षाने पालन होईल याकडे लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी पेड न्यूज समिती, संनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. निवडणूकविषयक विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी कार्यान्वित करावी, तसेच आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी दिले.

जिल्ह्यातील ११ निवडणूक विभाग आणि १४ निर्वाचक गणांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी अक्कलकुवा तालुक्यात २ निवडणूक विभाग आणि १ निर्वाचक गण, शहादा ४ विभाग आणि ८ गण, तर नंदुरबार तालुक्यात ५ निवडणूक विभाग व ५ निर्वाचक गण आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील ३४, शहादा १८६ आणि नंदुरबार तालुक्यातील २३६, अशा ४५६ मतदान केंद्रांवर २ लाख ८२ हजार ३८७ मतदार मतदानाचा हक्क

बजावतील. यापैकी १ लाख ३९ हजार ५४८ स्त्री आणि १ लाख ४२ हजार ८३९ पुरुष मतदार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.