नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा नगरपालिका आणि धडगाव नगरपंचायतीत कार्यरत कर्मचा:यांनी नवीन वर्षाच्या आरंभी संप पुकारल्याने प्रशासनाची दाणादाण उडाली आह़े सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या या संपात पालिका क्षेत्रातील एकूण 707 कर्मचा:यांनी सहभाग दिला आह़े महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना यांनी राज्यभर हा संप पुकारला असून जिल्ह्यातील पालिका कर्मचारी त्यात सहभागी झाले आहेत़ गेल्या आठ दिवसांपूर्वी पालिका कर्मचा:यांनी निवेदने देत मागण्यांसाठी संपावर जाण्याचे म्हटले होत़े त्यानुसार सकाळी 10 वाजेपासून पालिका मुख्यालयांसमोर संपाला सुरुवात करण्यात आली़ नंदुरबार येथे संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र पाखले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आह़े यावेळी उपाध्यक्ष मतीन हासनी, सचिव शशिकांत बी वाघ, रविंद्र काटे, अनिल सोनार, किशोर वाडीले, राजेश श्रीमाळ, रविंद्र पवार, राजेश परदेशी, प्रकाश सेना कुंभार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होत़े संपाला सुरुवात झाल्यानंतर त्यात पाणी पुरवठा, अगिAशमन आणि आरोग्य विभाग या अतीआवश्यक सेवांना वगळण्यात आले असून त्यांच्याकडून कामकाज ठेवण्यात आले होत़े राज्यातील पालिकांमधील 2000 पूर्वीच्या पालिका कर्मचा:यांना कायम करण्यात यावे, मयत कर्मचा:यांच्या कुटूंबांना सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्रामपंचयतींची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, सफाई कामगारांना पदोन्नती, वारसांना वरिष्ठ पदांवर पदोन्नती, लाड कमीशनच्या सेवा शिफारशी लागू कराव्यात यासह सफाई विभागाची ठेका पद्धत रद्द करण्यात यावी आदी 20 मागण्यांसाठी हा संप पुकारला गेला आह़े संपामुळे नंदुरबार वगळता शहादा, नवापूर, तळोदा पालिका आणि धडगाव नगरपंचायत क्षेत्रात सकाळी कचरा संकलन झाले नाही़ तर नंदुरबार शहरात सफाई करणा:या कामगारांनी सकाळपासून हजेरी न लावल्याने कचरा पडून असल्याचे दिसून येत होत़े नंदुरबार पालिकेत 400, शहादा 150, नवापूर 84 तर तळोदा नगपालिकेत 57 कर्मचारी तसेच धडगाव नगरपंचायतीतील 16 कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत़ यात सफाई कामगार, नोंदणी कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी आणि पालिकेतील अभियंता संवर्गातील तांत्रिक अधिकारी व कर्मचा:यांसह सर्व लिपिक वर्गीय कर्मचा:यांचा सहभाग आह़े त्यांच्याकडून दिवसभरात कोणत्याही प्रकारचे कामकाज न झाल्याने पालिका कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता़ बहुतांश कर्मचारी संघटनेच्या आदेशानुसार पालिकोच्या आवारात बसून होत़े संपाची माहिती नसल्याने पालिकेत विविध कामांसाठी गेलेल्या नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली़ सर्व पालिका हद्दीत काम करणा:या पाणी पुरवठा विभागाचे कार्यालयीन कर्मचारी वगळता घरोघरी पाणी सोडणारे व्हॉल्वमन सकाळपासून कामावर हजर होत़े नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा शहरात त्यांच्याकडून सकाळी पाणी सोडण्यात आल़े त्यांच्यासोबतच अगिAशमन कर्मचारीही कामावर हजर होत़े येत्या दोन दिवसात शासनाने पालिका कर्मचा:यांच्या मागण्यांचा विचार न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येऊन व्हॉल्वमनही संपात सहभागी होणार आहेत़
वेतन आयोगासाठी 700 पालिका कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:34 AM