नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : विद्यार्थी व पालकांमध्ये जिल्हा परिषद शाळेबाबत गोडी निर्माण व्हावी यासाठी येथील केंद्रशाळेत दर शनिवारी विद्याथ्र्याना रुचकर भोजन देण्यात येते. आमरसाच्या गोडव्यासोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभात तयार विद्याथ्र्याना मध्यान्ह भोजन देण्यात येते. या उपक्रमाचे पालकांकडून स्वागत होत आहे.विद्याथ्र्यानी शाळेत नियमित यावे, पटसंख्या वाढावी, शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शिक्षक विविध प्रय} करताना दिसून येतात. असाच प्रयोग येथील मुलांच्या जि.प. शाळेत सुरू आहे. मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत महिन्यातून किमान चार दिवस विद्याथ्र्याना पौष्टीक व जीवनसत्वयुक्त पोषण आहार दिला जावा, अशी तरतूद आहे. विद्याथ्र्याना पूरक आहार मिळावा यासाठी येथील शिक्षकांनी वेगळीच शक्कल लढवून दर शनिवारी आमरसाच्या गोडव्यासोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभातचा पाहुणचार विद्याथ्र्याना दिला जात आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांना शिकविण्याचा पालकांचा कल जास्त दिसून येतो. त्यामुळे जि.प. शाळांकडे मुलांची संख्या कमी होताना दिसते. मात्र जि.प. शाळेतील शिक्षकही शिकविण्यासोबतच अन्न शिजविण्याच्यार्पयत जातीने लक्ष देऊन विद्याथ्र्याची काळजी घेताना दिसून येत आहेत. शिक्षणासोबतच शालेय पोषण आहारात जर बदल केला तर नक्कीच शालेय पटसंख्येत वाढ होईल, असे त्यांना वाटते आणि ते खरेही ठरत आहे. शनिवार म्हटला की विद्याथ्र्याची उपस्थिती घटते. त्यामुळे शनिवारी विद्याथ्र्याना पोषण आहार देण्याचा उपक्रम सुरू केल्याने विद्यार्थी संख्या वाढत आहे. यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर मुख्याध्यापक रामलाल परधी यांनी विद्याथ्र्याना चक्क आमरसाची मेजवानी दिली. त्यासोबत रशी-भातचे जेवणही दिले. शिक्षक दर्पण भामरे यांनी स्वत: बाजारात जाऊन आंबे आणले. शिक्षिका संगीता राणे, अनिता पाटील यांनी पोषण आहार शिजविणा:या महिलांच्या सहकार्याने शाळेतच आंब्याचा रस तयार केला. या पाहुणचारामुळे विद्यार्थीही खूष झाले. शनिवारीही विद्याथ्र्याना आमरससोबत पुरी, भजी, गुळाची जिलेबी, पापड, मसालेभातचे जेवण देण्यात आले. या वेळी केंद्रप्रमुख एन.आर. निकुंभ उपस्थित होते. शाळेत शनिवारी राजगिराचे लाडू, बिस्किट, अंडी, सफरचंद, शेंगदाणे, चिक्की, शिरा आणि आता चक्क आमरस यामुळे विद्याथ्र्यामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण होत असून विद्याथ्र्यानाही पौष्टीक व जीवनसत्वयुक्त पोषण आहार मिळत आहे.
आमरस-पुरीच्या पाहुणचाराने विद्यार्थी तृप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:25 PM