शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

उघडय़ा रोहित्रामुळे विद्यार्थी असुरक्षित : कोठार आश्रमशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 11:56 AM

महावितरण अभियंत्यांना निवेदन

कोठार : तळोदा तालुक्यातील कोठार येथील अनंत ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या जवळ असणारी विद्युत रोहित्र विद्याथ्र्यासाठी धोकादायक ठरत आहे. रोहित्राचे इतरत्र स्थलांतर करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शाळा व्यवस्थापनाकडून होत आहे.सातपुडय़ाच्या पायथ्याशी असणा:या तळोदा तालुक्यातील कोठार येथे मागील 25 वर्षापासून अनुदानित आश्रमशाळा सुरु आहे. या शाळेत सुमारे आठशे विद्यार्थी निवासी स्वरूपात शिक्षण घेतात. गावात सुरुवातीलाच मुख्य रस्त्यालगत ही आश्रमशाळा आहे. गावाला वीज पुरवठा करण्यासाठी गावात प्रवेश करणा:या मुख्य रस्त्याच्या लगतच विद्युत वितरण कंपनीकडून रोहित्र अर्थात डीपी बसविण्यात आली आहे.परंतु ज्या ठिकाणी हे विद्युत रोहित्र बसविण्यात आले आहे ती जागा गैरसोयीची आह़े आश्रमशाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच जनावरांसाठीदेखील धोकेदायक ठरणारी आहे. या रोहित्रामध्ये व शाळेच्या आवारात केवळ एक संरक्षक भिंतीचे अंतर आहे. या भिंतीला लागूनच विद्याथ्र्याची पाणी व कपडे धुण्याची सोय आहे. गावात प्रवेश करणा:या मुख्य रस्त्याला लगत हे विद्युत रोहित्र आहे.या रस्त्यावर व रोहित्राच्या परिसरात दिवसभर विद्यार्थी, ग्रामस्थ, वाहने व शेतशिवारात विविध कामानिमित्त ये-जा करणा:या जनावरांची वर्दळ असते. ह्या विद्युत रोहित्रावरील फ्यूजपेटीचा दरवाजा अनेकदा उघडा असण्याचे दिसून आले आहे. कळत-नकळत रस्त्यावरून जाणा:या व्यक्ती किंवा प्राण्याचा स्पर्श झाला तर अनुचित प्रकार घडू शकतो. शिवाय गावात प्रवेश करणारा रस्ता हा चढावावरील असल्याने या रस्त्यावरून गावात जाणारी दुचाकी व चारचाकी वाहने ही वेगात चढत असतात.अश्या परिस्थिती वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट रोहित्रावर देखील आदळून मोठा अपघात होऊ शकतो. त्यामुळे हे रोहित्र गावातील मोकळ्या जागेत किंवा इतरत्र स्थलांतर करावे अशी मागणी मागील दोन वर्षापासून शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे.परंतु याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांचे दुर्लक्ष होत आह़े सलसाडी ता.तळोदा येथे वीजेचा धक्का लावून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शाळा व्यवस्थापनाकडून हे विद्युत रोहित्र इतरत्र स्थलांतरित करण्यात यावे, अश्या मागणीचे पत्र बोरद व तळोदा अश्या दोन्ही कार्यालयातील वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले आहे. भविष्यात कोणत्याची प्रकारची अप्रिय घटना घडू नये यासाठी वीज वितरण कंपनीने याकडे कानाडोळा न करता तात्काळ आश्रमशाळेलगत असणारे हे विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्यासाठी योग्य कार्यवाही करणे अपेक्षित आहे.