नंदुरबार : नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयात मंगळवारी दिवसभर विद्यार्थी ताटकळत बसल़े विद्याथ्र्याची जास्त गर्दी होत असल्याने जात प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयाकडून मुख्य व्दाराला कुलूप लावण्यात आले होत़े त्यामुळे विद्याथ्र्यासह पालक मोठय़ा प्रमाणात संतप्त झाले.सध्या सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आह़े त्यामुळे त्यासाठी लागणा:या विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी विद्याथ्र्यामध्ये लगबग दिसून येत आह़े आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी अनेक आदिवासी विद्यार्थी नंदुरबार येथील अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीकडून जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून फिराफिर करीत आहेत़ आधीच तपासणी समितीकडे कर्मचा:यांची वानवा असल्याने बहुसंख्य विद्याथ्र्याचे प्रकरणे निकाली काढताना कर्मचा:यांची दमछाक होत आह़े गेल्या काही दिवसांपासून कार्यालयात विद्याथ्र्यानी आपापली प्रकरणे दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती़ त्यामुळे मंगळवारी विद्याथ्र्याची गर्दी होत असल्याचे पाहून जात पडताळणी कार्यालयाकडून बाहेरील मुख्य प्रवेश व्दाराला आतमधून कुलूप लावण्यात आले होत़े यामुळे विद्याथ्र्याचे प्रचंड प्रमाणात हाल झाल़े मुख्य व्दाराजवळ कंत्राटी कर्मचा:यांमार्फत विद्याथ्र्यानी आणलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात होती़ मात्र संबंधित कंत्राटी कर्मचा:यांकडूनही विद्याथ्र्याना समाधानकारक उत्तरे दिली जात नव्हती़ तेथील कर्मचारीसुध्दा अकुशल असल्याने त्यांनाही कागदपत्रांची व्यवस्थित माहिती नव्हती़ जात पडताळणी समितीच्या अधिका:यांना विद्याथ्र्याच्या समस्या सोडविण्यासाठी येण्यास वेळ नसल्याचे दिसून आल़े
जात वैधतेसाठी संपूर्ण दिवस ताटकळत बसले विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:46 PM