शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

60 ठिकाणी सब-वे : नंदुरबार-सुरत अवघ्या दोन तासांचा होणार प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:30 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत 300 कि.मी.अंतरात तब्बल 60 सब वे काढण्यात आले असून यामुळे ही लाईन मुंबई परिमंडळात सर्वात सुरक्षित रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान, उधना ते सुरत दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकला जाणार असल्यामुळे ताप्ती सेक्शनवरील रेल्वे गाडय़ांना होणारा 25 ते 30 मिनिटांचा उशीर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : उधना-जळगाव रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाअंतर्गत 300 कि.मी.अंतरात तब्बल 60 सब वे काढण्यात आले असून यामुळे ही लाईन मुंबई परिमंडळात सर्वात सुरक्षित रेल्वे लाईन म्हणून ओळखली जाणार आहे. दरम्यान, उधना ते सुरत दरम्यान तिसरा रेल्वेमार्ग टाकला जाणार असल्यामुळे ताप्ती सेक्शनवरील रेल्वे गाडय़ांना होणारा 25 ते 30 मिनिटांचा उशीर आता कमी होणार आहे. उधना-जळगाव रेल्वे मार्गाचे काम 75 टक्के पुर्ण झाले आहे. उधना ते नंदुरबार आणि जळगाव ते शिंदखेडा दरम्यानचे काम पुर्ण झाले आहे. आता शिंदखेडा ते नंदुरबार दरम्यानचे काम बाकी आहे. हे काम मार्च 2018 अखेर पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु सध्याची कामाची गती पहाता ते शक्य नसल्याची स्थिती आहे. सुरक्षीत मार्ग म्हणून ओळख300 किलोमिटर अंतराच्या या मार्गावर तब्बल 60 सबवे काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे हा रेल्वे मार्ग सर्वात सुरक्षीत राहणार आहे. 60 सबवेंवर एकुण 60 कोटी अतिरिक्त खर्च आला आहे. या सबवे मुळे खाजगी वाहने आणि रेल्वे    यांच्यातील धडक किंवा मानवरहित रेल्वे फाटके ही बाब कालबाह्य ठरणार आहे. याशिवाय रेल्वे गाडय़ांची वर्दळीच्या वेळी त्यांना पासींगसाठी देखील सात वेगळे पूल तयार  करण्यात आले आहेत. सिगAलची अत्याधुनिक यंत्रणा देखील  कार्यान्वीत करण्यात येणार आहे. आरआरआय रिले रूट इंटरलॉकिंग याचा उपयोग त्यासाठी केला जाणार आहे. अर्धा ते पाऊण तास वायासध्या सुरत ते भुसावळ या प्रवासात अर्धा ते पाऊण तास वाया जात आहे. त्याला कारण सुरत ते उधना दरम्यान मुंबई लाईनवर गाडय़ांची वर्दळ आणि त्यांना पासिंगसाठी ताप्ती सेक्शनवरील गाडय़ांना थांबवून ठेवणे हे आहे. त्यामुळे किमान 25 ते 30 मिनिटे किंवा जास्तीत जास्त 45 मिनिटांचा वेळ वाया जातो. त्यामुळे एकतर गाडय़ा सुरत किंवा उधना स्थानकावर थांबून राहतात.आता उधना ते सुरत या 19 कि.मी.च्या अंतरात तिसरी रेल्वे लाईन टाकली जाणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाडय़ा या तिस:या ट्रॅकवर वळविण्यात येणार असल्यामुळे  रहदारी सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.या रेल्वेंना होतो उशीरसध्याच्या परिस्थितीत ताप्ती सेक्शनमधील ताप्ती-गंगा, अहमदाबाद-ईलाहाबाद, बडोदा-वाराणसी, महामना-मालदा टाऊन, ओखा-पूरी, अहमदाबाद-पूरी, हावडा, नवजीवन, बिकानेर-सिकंदराबाद, जोधपूर-चेन्नई, अहमदाबाद-यशवंतपूर, अजमेर-पूरी, पोरबंदर-हावडा, गांधीधाम-विशाखापट्टणम, राजकोट-रेवा, हापा-बिलासपूर, ओखा-रामेश्वरम,  अहमदाबाद-दरबंगा या एक्सप्रेस गाडय़ांचा समावेश   आहे. त्यांना सुरत स्थानकानंतर उधनामार्गे भुसावळ लाईनवर वळविण्यात येते. प्रत्येक गाडीला यामुळे सहाजिकच किमान अर्धातास उशीर होतो. आता टाकण्यात येणारी तिसरी लाईन ही सुरत रेल्वे स्थानकातील चौथ्या फ्लॅटफार्मवरून थेट उधना स्थानकाच्या भुसावळ रेल्वे लाईनर्पयत राहणार आहे त्यामुळे थेट पासींग होण्यास मदत होणार आहे.