लोकमत न्यूज नेटवर्कब्राम्हणपुरी : खेडदिगर गावात शेतातील विहिरीमध्ये बिबट्याचे दीड ते दोन महिन्याचे बछडे पडल्याची घटना घडली आहे. विहीर कोरडी असल्यांन बिबट्याचे बछड्याचे प्राण वाचले. सकाळी नागरिक रस्त्याने येत जात असतांना त्यांना हा प्रकार लक्षात आला. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन बिबट्याचा बछड्याची रेस्क्यू करून काढण्यात आले आहे सवित्तर वृत्त असे की खेडदिगर येथील अनिमेश शाह यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत बिबट्याचे दीड ते दोन महिने वय असलेले बछडा पडल्याचे दिसून आले.याची माहिती संबंधित शेतमालकाने वनविभागास दिल्याने घटनास्थळी वनविभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले आहे शेत मालक व गावकऱ्याच्या म्हणण्या नुसार सदर बिबट्याचे बछडा बिबट्याच्या विहिरी मध्ये पडल्या नंतर मादा बिबट्या ही आपल्या एका बछड्या सोबत येथे फिरत असल्याचे सांगण्यात येत होते. मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या या शेतात मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाच्या पथकाने परिश्रम करून बिबट्या च्या बछड्याला सुरक्षित कडून मंदाना येथे हलवले आहे .या वेळी नंदुरबार डी एफ.ओ. एस. बि. केवटे, शहादा गस्ती पथकाचे रत्नपारखे मंदाना वनपाल एस. एस. देसले, आदी सह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 1:06 PM