शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

कमी लोकसंख्येच्या गावाची अशीही व्यथा़़़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:15 AM

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसंख्या कमी असली की विकासाची गती वाढते असं म्हटलं  जातं, याचा ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसंख्या कमी असली की विकासाची गती वाढते असं म्हटलं  जातं, याचा प्रत्यय एव्हाना येतोच़ परंतू बोटावर मोजली जाणारी माणसे असूनही विकासापासून लांबच असल्याचं उदाहरण म्हणजे वरवली ता़ धडगाव हे गाव आह़े जाण्यासाठी रस्ता किंवा इतर कोणतीही सुविधा नसलेल्या या गावाची व्यथा म्हणजे असुविधांची कथाच आह़े  2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 11 हजार 4 लोकसंख्या असलेलं गाव म्हणजे लोणखेडा ता़ शहादा तर सर्वाधिक कमी केवळ 26 व्यक्तींचा निवास असलेलं गाव म्हणून वरवली ता़ धडगाव याचा उल्लेख करण्यात येतो़ 2011 च्या जनगणनेनंतर 8 वर्षे उलटूनही यात फारसा काही फरक पडलेला नसल्याचे वरवली येथे प्रकर्षाने दिसून येत आह़े आठ वर्षात 26 ऐवजी लोकसंख्या 36 एवढी झाली असली तरी विकासाची मात्र प्रतिक्षा कायम आह़े  भूषा ता़ धडगाव ग्रामपंचायतीत समाविष्ट असलेल्या वरवली या गावाला नोव्हेंबर 2018 मध्ये महसूली गावाचा दर्जा मिळाल्यानंतर तरी समस्या सुटणार अशी अपेक्षा होती़ परंतू धडगाव तालुका प्रशासनात काम करणा:या अनेकांना ‘ह्या नावाचे गाव अस्तित्वात आहे का,’ हाच पहिला प्रश्न पडतो़ भूषा पॉईंटपासून मणिबेलीकडे जाताना डाव्या बाजूला चहू बाजूने पाण्याने वेढलेल्या टेकडीवर सात ते आठ घरांची वस्ती असलेल्या वरवलीर्पयत पोहोचण्यासाठी खाजगी बोट किंवा बाजर्चा आधार घ्यावा लागतो़ नर्मदा विकास विभागाच्या बार्ज उपलब्ध न झाल्यास येथील ग्रामस्थ धडगाव येथे विविध कामांसाठी होडीने येतात़ सरदार सरोवरातून होडीने भूषा पॉईंटर्पयत पोहोचण्यासाठी त्यांना किमान दीड ते पावणे दोन तास लागतात़ पावसाळ्यात मात्र संपर्क तुटत असल्याने येथील ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत असल्याची माहिती देण्यात आली़ बाह्यजगाशी खूप संपर्क नसलेल्या या गावात वीज, पिण्याचे शुद्ध पाणी, मोबाईल, टीव्ही, दूरध्वनी किंवा तत्सम कोणतेही डिजीटल साहित्य आजवर पोहोचलेले नाही़ अशा स्थितीतही स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही येथे आदिवासी बांधव येथे निवास करत आहेत़ शिक्षणाची कोणतीही सोय नसल्याने येथील बालके शाळबाह्यच असल्याचे तेथे भेट दिल्यास सर्वात आधी समोर येत़े एकीकडे असुविधा असल्या तरी एकमेकांच्या मदतीला धावून सर्वजण कायम सोबत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगण्यात आल़े 

देशातील सर्वात कमी लोकसंख्येची वस्ती ही अंदमान निकोबार बेटसमूहातील ईस्ट बेटावर आह़े येथे केवळ 16 लोक राहतात़ त्यानंतर अरुणालचल प्रदेश, नागालँड, हिमाचल प्रदेशात किमान 350 लोकसंख्या असलेली गावे आहेत़ या गावांना वर्षभरात अनेक जण भेटी देऊन तेथील विकासावर चर्चा करत असतात़ परंतू 36 लोकसंख्येच्या वरवली गावाच्या आजवरच्या इतिहासात शासकीय कर्मचा:याने येथे भेटच दिलेली नसल्याचा दावा केला जातो़  

भूषा पॉईंटपासून सरदार सरोवरातून बाजर्ने गेल्यावर 15 मिनीटात डोंगरावर सात ते आठ घरांचा समूह दिसून येतो़ येथे पिण्याचे पाणी म्हणून नर्मदेच्या पाण्याचा वापर होतो़ बाह्यजगाशी संपर्क ठेवण्याचे साधन म्हणून येथे केवळ एक खाजगी होडी आह़े त्यातून वेळीअवेळी प्रवास करत येथील नागरिक मुख्य प्रवाहात येण्याचा आटोकाट प्रयत्न करतात़ गावात अद्यापही शासनाचे स्वच्छ भारत अभियान पोहोचलेले नसल्याचे नजरेस पडत़े 

बिबटय़ा आणि अस्वालासारखे हिंस्त्र प्राणी, विषारी साप आणि सरोवराच्या पाण्यातील मगरी यांची कायम दहशत असूनही येथील नागरिक जीवन कुंठीत आहेत़ अत्यंत दुर्गम अशा या गावात रोजगार नसल्याने काहींनी स्थलांतर केल्याने येथे तूर्तास चार ते पाच कुटूंबांचा रहिवास आह़े 

काहींनी आसपासच्या गावांमध्ये शिक्षण घेतले असले तरी रोजगाराअभावी ते घरीच आहेत़  प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या गावाचे स्थलांतर झाले असले तर मग, नोव्हेंबर 2018 मध्ये महसूली गावाचा दर्जा नेमका कशासाठी असाही प्रश्न उपस्थित करण्यात येतो़ आरोग्य विभागाकडून चालवण्यात येणा:या तरंगत्या दवाखान्याची मात्र येथील ग्रामस्थांना मोठी मदत होत असल्याचे सांगण्यात आल़े आठवडय़ातून एकदा डोंगराखाली पाण्यात येणा:या दवाखान्यातून लहान बालकांसाठी औषधी मिळून तात्पुरती सोय होत़े 

केवळ 26 नागरिकांची नोंद असलेल्या या गावातील युवकांना मतदान ओळखपत्र, नव्या शिधापत्रिकांसह विविध दाखले देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली़ दाखला काढण्यासाठी गेल्यावर युवकांना धडगावला मुक्कामच करावा लागतो़