लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शेतक:यांनी बाहेरच्या साखर कारखान्यांना ऊस न देता सातपुडा साखर कारखान्याला द्यावा. कारखान्याने उसाला 2 हजार 315 रुपये प्रतिटन भाव जाहीर केला आहे. कारखाना सुरू झाल्यानंतर 27 नोव्हेंबरपयर्ंत 13 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील यांनी दिलीपी.आर. पाटील यांनी सांगितले की, ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांचाही ऊस कारखान्यातर्फे घेण्यात येईल. कारखान्याच्या सभासदांनी अथवा तालुक्यातील शेतक:यांनी बाहेरच्या कारखान्याला ऊस देऊ नये. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने शेतक:यांची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अद्यापही काही शेतक:यांना उसाचे पेमेंट मिळाले नाही. त्यामुळे शेतक:यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. सातपुडा कारखान्यात रोज साडेतीन हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होत आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गटात ऊस तोडणी कामगार पोहोचले आहे. त्यांनी ऊस तोडणीला सुरुवात केली असून, ऊस तोडणी विषयी शेतकरी अथवा सभासदांना अडचण आल्यास त्यांनी कारखान्याशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात शहादा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतक:यांना करण्यात आले आहे. त्यामुळे गळीत हंगामाच्या अखेर्पयत परिसरातील ऊस अन्य ठिकाणी जाणार नाही, यासाठी विशेष काळजी देखील घेतली जात असल्याचेही सांगण्यात आले.
सातपुडा साखर कारखान्यात ऊस गाळपास गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2019 12:58 PM