प्रहार शेतकरी संघटनेचा पाठिंबा असून या भारत बंद यशस्वी करण्यासाठी शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी एकजुटीचे दर्शन घडवून बंद यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने रद्द करावेत, तसेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा दीडपट हमीभाव मिळावा, खासगीकरणाची नीती बंद करावी, पेट्रोल, डिझेल, गॅस इत्यादींच्या किमती कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच केंद्र सरकार आणणार असणारे वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्यावे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत कामाचे दिवस वाढवून शेत मजुरांचे रोजगार हमीचे वेतन दुप्पट करावे. राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांच्या सीबी स्कोअर तसेच ज्या ओटीएस योजनेत बँकेचे कर्ज भरले आहे, त्या शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मंजूर करावे यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.
सोमवारच्या भारत बंदला जिल्ह्यातील संघटनांचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:32 AM