लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 23 : शहादा बाजार समितीचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे. ज्या आठ व्यापा:यांचे परवाणे रद्द करण्यात आले होते त्या निर्णयाला संचालक मंडळाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. शेतक:यांचे हित लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांनी दिली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर शहादा बाजार समितीतील आठ व्यापा:यांचे परवाणे हे सचिवांनी रद्द केले होते. तेंव्हापासून बाजार समितीचे कामकाज ठप्प पडले आहे. शेतक:यांचा माल शेतात पडून आहे. धान्यमाल ठेवण्यास जागा नसल्यामुळे शेतक:यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतक:यांची मागणी व हित लक्षात घेता सर्वपक्षीय नेते व पदाधिका:यांनी बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या आठ व्यापा:यांचे परवाणे रद्द करण्यात आले होते त्या निर्णयाला संचालक मंडळाच्या बैठकीत स्थगिती देण्यात आली. सचिवांना हा अधिकार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. बाजार समितीत धान्य खरेदीसाठी व्यापारीच नाहीत. नवीन परवाण्यासाठी कुणीही उत्सूकत दाखविली नाही. त्यामुळे बाजार समितीचे कामकाज आणखी काही दिवस बंद ठेवणे बाजार समिती आणि शेतक:यांच्या हिताचे ठरणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून बाजार समिती पुर्ववत सुरू होणार आहे. पूर्वीचेच व्यापारी धान्य खरेदी करणार आहेत. त्यामुळे शेतक:यांनी आपला शेतीमाल मंगळवारपासून नियमितपणे विक्रीसाठी आणावा असे आवाहन देखील दिपक पाटील यांनी केले आहे.
‘त्या’ आठ व्यापा-यांच्या परवाने निलंबनाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:44 PM