नंदुरबार : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आणि रखडलेल्या पाणी प्रकल्पांना निधी उपलब्ध करून कामांना सुरुवात करावी यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले, त्यानंतर उपोषणाला सुरुवात करण्यात आली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे यापूर्वी तालुकास्तरावर मोर्चे काढण्यात आले होते. आता जिल्हास्तरावर उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष घन:शाम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. तसेच उपोषणाला सुरुवात करण्यात आली. दुष्काळ तातडीने जाहीर करावा व त्या अनुषंगाने असलेल्या सवलती शेतक:यांना उपलब्ध करून द्याव्या अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.जिल्हाधिका:यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, कापूस ही पीके घेतली जातात. यंदा पजर्न्यमान अत्यंत कमी झाल्यामुळे या पिकांना फटका बसला आहे. उत्पादनात 50 टक्केर्पयत घट आली आहे. सध्या शेतात असलेली पीके पाण्याअभावी जळत आहेत. ही पीके हातून गेल्यानंतर येत्या 16 महिन्यात कुठलीही पीके शेतक:यांच्या हाती येणार नाहीत हे स्पष्टच आहे. शेतीवर आधारीत पुरक उद्योग देखील ढेपाळला आहे. जिल्हाभरातील पाण्याची पातळी देखील खालावली आहे. जिल्ह्यात झालेले सिंचन प्रकल्प शेतक:यांच्या शेतार्पयत पाणी पोहचविण्यात अपयशी ठरले आहेत. चौपाळे गावात पाण्यासाठी आंदोलन झाले तेथे शेतक:यांवर लाठीमार आणि अश्रूधूर सोडण्यात आले. शेतक:यांना कुणी वालीच नाही हे यावरून सिद्ध होते. मागण्या मान्य होत नाहीत तोर्पयत उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दुष्काळाच्या दाहकतेमुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले व कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली तर त्याची जबाबदारी प्रशासन राहणार असल्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.
नंदुरबारात ‘दुष्काळ’ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानीचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:11 AM