प्रवाशी आमचे दैवत या बस महामंडळाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांच्या शंका निरसन वाहतुक नियंत्रक करत असल्याने अनेक प्रश्नाना उत्तरे देत असतात. मात्र काही प्रवाशांना दिलेली माहीती समजून येत नाही, बस काही वेळापुर्वी गेलेली असते किंवा काही कारणास्तव बसला उशीर होत असतो त्यामुळे प्रवाशी कर्मचाऱ्यासोबत वाद घालत असतात. अशावेळी तोंडात साखर व डोक्यावर बर्फ घेऊन त्यांच्या समस्याचे सोडवण्यासाठी काम करावे लागते. काही प्रवाशांची समस्या सोडवण्यासाठी बस स्थांनकांतील वरीष्ठ अधिकांऱ्याना पाचारण करून मदत केली जाते.
प्रवाशांना माहीती देताना किमान आठ तास सलग बोलावे लागत असल्याने काही प्रमाणात थकवा जाणवत असतो. वाद घालणाऱ्या प्रवाशांमुळे मनस्ताप होत असतो,त्यामुळे काम करताना मानसिक शांतता नसल्याने माहिती देताना परिणाम जाणवतो. दिवसभर काम करून घरी गेल्यावर काही वेळ निवांत बसल्याने दिवसभराचा मनस्ताप नाहीसा होतो,त्यानंतर कुटूंबासोबत गप्पा मारत वेळ घालवत असतो, त्यामुळे दिवसभर जनसंपर्काचे काम करून कोणतेही नुकसान होत नाही.
आम्ही कर्मचारी दिवसभर काम करताना प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा करतो, प्रवाशांनी माहिती विचारण्याआधी बसचे वेळापत्रक वाचून घ्यावे, माहिती विचारताना संयमाने बाेलावे, प्रवाशांना माहिती देतांना फोन घेतला जात नाही तरी प्रतिक्षा करणे आवश्यक असते,सांगितलेली माहिती काळजीपुर्वक ऐकावे,माहिती समजली नसेल तर परत विचारावे,बसला काही कारणासत्व उशीर झाला तर सहकार्याची भावना ठेवली पाहीजे. प्रवाशांनी सहकार्याची भावना ठेवली तर समस्या लवकर सोडवता येते.
- मुरलीधर बहिरम,वाहतुक नियंत्रक,बसस्थानक नंदुरबार