चिनोदा : जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतशिवारात बिबटय़ाचा संचार सुरु असताना तळोदा शहर मात्र याला अपवाद ठरत आह़े जिल्ह्यात शेतशिवारात फिरणारा बिबटय़ा इथे वनविभाग कार्यालयाच्या आवारात फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शीना दिसून येत असून यावर वनविभाग कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याने नागरिक चिंतेत आहेत़ गुजरात आणि महाराष्ट्र सिमेला लागून असलेल्या तळोदा शहरातील ब:हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर मेवासी वनविभागाचे कार्यालय आह़े गुजरात राज्याच्या बहुरुपा गाव हद्दीर्पयत विस्तारलेल्या या कार्यालय आवारात गेल्या 10 दिवसांपूर्वी बिबटय़ा दिसून आला होता़ याबाबत नागरिकांनी वनविभागाला संपर्क केला असता, बिबटय़ा दिसून आलेला नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली होती़ परंतू बुधवारी सायंकाळी राज्यमार्गाला लागून असलेल्या फॉरेस्ट नाका परिसर आणि बहुरुपा रस्त्यावर नागरिकांना पुन्हा बिबटय़ा दिसून आला़ काही तरुणांना बिबटय़ा दिसल्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला़ ही माहिती त्यांनी नाक्यावर उपस्थित असलेल्या वनकर्मचा:यांना दिल्याचे समजते परंतू तोवर बिबटय़ा बहुरुपा रस्त्याने निघून गेल्याचे सांगण्यात आले आह़े हा बिबटय़ा वनविभाग कार्यालयाच्या आवारातील विस्तीर्ण अशा झाडीत लपल्याचे सांगण्यात येत आह़े ब:हाणपूर अंकलेश्वर मार्गाला लागून असलेल्या या मार्गावरुन पहाटे फिरण्यासाठी जाणा:या काहींना बिबटय़ा दिसल्याचे सांगण्यात आले होत़े गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात बिबटय़ांचा वाढलेला संचार आणि ईस्लामपूर शिवारातील बालकाच्या मृत्यूची घटना ताजी असताना वारंवार दिसणा:या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आह़े
तळोदा वनविभाग कार्यालयाच्या आवारात पुन्हा दिसून आला बिबटय़ा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:52 PM