ऑनलाईन लोकमततळोदा, दि़ 22 : ‘निकृष्ठ रस्ता दर्जा उन्नती’ योजनेतून तळोदा-शहादा मतदार संघातील निकृष्ठ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनातर्फे साडेबारा कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी दिली़याबाबत त्यांच्याकडून एक पत्र प्रसिध्द करण्यात आले आह़े त्यात दिलेल्या माहितीनुसार, निकृष्ठ रस्त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासनाने यंदापासून ‘रस्ता दर्जा उन्नती योजना’ हाती घेतली आह़े मु्ख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून त्याचा निधी देण्यात येणार आह़े तळोदा-शहादा मतदार संघातील रस्ता दर्जा उन्नतीसाठी साधारण 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आह़े त्यात, 2017-2018 या आर्थिक वर्षात तळोदा तालुक्यासाठी 7 कोटी 24 लाख 40 हजार रुपये देण्यात आले आह़े त्यात, दलेलपूर ते धवळीविहीर हा पाच किमीच्या रस्त्यासाठी 275.37 हजार रुपये, खेडले साडे तीन किमी रस्त्यासाठी 190.56 हजार रुपये, उमरी ते कळमसरे साडेतीन किमी रस्त्यासाठी 200.46 हजार रुपयांची तरतुद आह़े शहादा तालुक्यातील रस्त्यांसाठी पाच कोटी 20 लाख 66 हजार रुपये मंजूर करण्यात आले आह़े यात, वडछील ते पुरुषोत्तम नगर या साडेपाच किमी रस्त्यासाठी 228. 87 हजार रुपये, तिखोरा ते लोहारा या साडेतीन किमी रस्त्यासाठी 160.26 हजार, श्रीखेड ते भोरटेक या दोन किमी रस्त्यासाठी 131.53 हजार रुपयांची तरतुद आह़े संपूर्ण राज्यभरात ही योजना राबवली जात असल्याचे या वेळी सांगण्यात आल़ेया निधीतून शहादा-तळोदा तालुक्यातील 25 किमीचे नवीन रस्ते निर्माण करण्यात येणार आह़े
तळोदा-शहादा : योजनेअंतर्गत रस्त्यांसाठी साडेबारा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:13 PM