लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कुठलाही कर व दरवाढ न करता तळोदा येथील नगरपालिकेने सादर केलेल्या 27 कोटींच्या अर्थसंकल्पास पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरी देण्यात आली़ या अंदाजपत्रकात पावणे सहा लाखाची शिलकी दाखविण्यात आली आह़ेतळोदा नगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शुक्रवारी घेण्यात आली़ सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजय परदेशी होत़े सभेत पालिकेचा 2018-2019 च्या अंदाजपत्रकास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली़साधारणत, 27 कोटींच्या या अर्थसंकल्पात कुठलीही कर व दरवाढ करण्यात आलेली नाही़ त्याच बरोबर 5 लाख 74 हजार रुपयांची शिल्लकदेखील दाखविण्यात आली आह़े या आर्थिक वर्षात पालिकेकडे 26 कोटी 95 लाख 2 हजार 897 रुपये उत्पन्न येणार आह़े त्यात, घरपट्टी, पाणीपट्टीसाठी 86 लाख 5 हजार, मुद्रांक शुल्क, करमणूक कर, जमीन महसूल बिनशेती 17 लाख 70 हजार, नगरपालिका सहायक अनुदान, मुख्याधिकारी वेतन अनुदान, रोजगार हमी, वाचनालय अनुदान, गौणखनिज अनुदान आदींसाठी 3 कोटी 86 लाख 38 हजार 326, जमिन भाडे, इमारत भाडे, दुकान भाडे 17 लाख, इतर उत्पन्न 5 लाख, व्याजापासून उत्पन्न 3 लाख 75 हजार, विशिष्ट अनुदाने खासदार-आमदार निधी 1 कोटी, अल्पसंख्याक अनुदान 10 लाख रस्ता अनुदान 15 कोटी, वैशिष्टयपूर्ण कामांसाठी अनुदान 75 लाख, नागरी दलीत वस्ती सुधारणा 50 लाख, नागरी आदिवासी पाणीपुरवठय़ासाठी साडेतीन कोटी, नागरी आदिवासी उपयोजना 3 कोटी, 14 वा वित्त आयोग 3 कोटी, महाराष्ट्र स्वच्छता मिशन 75 लाख 45 हजार असे एकूण 16 कोटी 40 लाख 45 हजारांचे उत्पन्न येणार आह़े सुरक्षित आणि असुरक्षित कज्रे एक कोटी 60 लाख या प्रमाणे पालिकेची जमेची बाजू आह़ेया अर्थसंकल्पातून पालिकेचे 26 कोटी 89 लाख 28 हजार 826 रुपयांचे खर्चाचे नियोजन आह़े त्यात, आस्थापना खर्च कर्मचा:यांचा पगार, पेन्शन, वैद्यकीय प्रतीपूर्ती, गणवेश 3 कोटी 75 लाख 8 हजार 825, छपाई खर्च 5 लाख, सामुहिक विमा 5 लाख, मालमत्ता व वाहन विमा पुरवठा, ऑफीस फर्निचर, संगणक दुरुस्ती 10 लाख, स्टेटलाईट बिल 22 लाख, जलप्रदुषण व प्रदुषण नियंत्रण खर्च 18 लाख, महसूल स्टॅम्प व सत्कार समारंभावरील खर्च 5 लाख 90 हजार, प्रवास व वाहनभत्ता 2 लाख 50 हजार, यात्रा खर्च स्वच्छ महाराष्ट्र मिशन, चौक सुशोभिकरण, निवडणूक खर्च, जनगणना, पशुगणना, व्यायामशाळा, भू-जलसव्रेक्षण, अतिक्रमण काढणे, अध्यक्ष मानधन, सभेचा खर्च असा एकूण खर्च 1 कोटी 20 लाख 90 हजार, इमारत दुरुस्ती,शाळा दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती, आठवडे बाजार दुरुस्ती, स्मशानभुमी लाकडे खरेदी, गटार दुरुस्ती, सार्वजनिक शौयालये, स्वच्छतागृह बांधणे, पाणीपुरवठा दुरुस्ती, असे एकूण 47 लाख 65 हजार, शववाहिनी खरेदी 1 लाख, झाडे लावणे, बागेचा खर्च अशा इतर व्यवस्थांसाठी 1 लाख 70 हजार, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास, अन्न सुरक्षा, महिला व बालकल्याण विकास, अपंग कल्याण निधी, दुर्बल घटक कल्याण निधी 17 लाख 77 हजार, भांडवली खर्च, गटार, नाले 10 लाख, रस्ते व पदपथ 20 लाख, शौचालये बांधणे 10 लाख, स्थानिक विकास कार्यक्रम 10 लाख, रस्ता अनुदान 50 लाख, वैशिष्टयेपूर्ण कामासाठी अनुदान अडीच कोटी, राजीव गांधी आवास योजना 6 लाख , खर्डी नदी यात्रा विकास निधी 10 लाख, आदिवासी वसती सुधारणा 2 कोटी, महानगरोथ्थान योजना 2 कोटी, नागरी आदिवासी वस्ती, पाणीपुरवठा स्वच्छता योजना अडीच कोटी, नागरी आदिवासी उपयोजना 75 लाख, पंतप्रधान आवास योजना 2 कोटी, रमाई घरकुल योजना एक कोटी, 14 वा वित्त आयोग 3 कोटी, स्वच्छ महाराष्ट्र मिशन 75 लाख असा एकूण 20 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आह़े या शिवाय शिक्षण कर 25 लाख, रोजगार हमी कर 2 लाख 50 हजार, उपकर 15 लाख याप्रमणे खर्चाचे नियोजन करण्यात आले आह़े
करवाढीपासून नागरिकांना दिलासा : तळोदा पालिका अर्थसंकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 2:47 PM