लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील शैक्षणिक संस्थेत कार्यरत शिक्षकाला एकाने जातीवाचक शिवीगाळ केली़ 21 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला़ शिवीगाळ करणारा शैक्षणिक संस्थाचालक असल्याची माहिती आह़े दादक्या सिंगा वसावे हे रजाळे येथील विनाअनुदान तत्त्वावरील शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ संस्थेला नुकतेच 20 टक्के अनुदान प्राप्त झाले होत़े यामुळे संस्थेतील सत्तरसिंग रामसिंग राजपूत याने दादक्या वसावे यांच्याकडून पाच लाख रुपयांची मागणी केली होती़ एवढी रक्कम देऊ शकणार नसल्याने वसावे यांनी सत्तरसिंग राजपूत यास नकार कळवला होता़ दरम्यान 21 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता संशयित राजपूत याने दादक्या वसावे यांना जाणता राजा चौकात बोलावून जातीवाचक शिवीगाळ केली होती़ याप्रकरणी वसावे यांनी शहर पोलीस ठाण्याकडे तक्रार अर्ज दिला होता़ त्याची पडताळणी करण्यात येऊन गुरुवारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती़ तपास पोलीस उपअधिक्षक रमेश पवार करत आहेत़ पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आह़े पोलीसांकडून संस्थाचालकाची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े
शिक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 11:54 AM