लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने जि.प.च्या याहामोगी सभागृहात जिल्हास्तरीय शैक्षणिक सहविचार सभा झाली. या सभेला मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा म्हणाले की, आकांक्षित हा शब्द चांगला असला तरी त्याचा नंदुरबारबाबत घेतलेला उल्लेख मात्र भूषणावह नाही. केंद्र शासनाच्या निती आयोगाने आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रोजगार, आवास या सर्व बाबतींत जिल्ह्याचा निर्देशांक उंचावण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने शिक्षण विभागातील सर्व क्षेत्रीय अधिका:यांनी प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रय}रत राहण्याचे आवाहन केले.डाएटचे प्राचार्य अनिल झोपे यांनी नंदुरबार जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता विकास कृती कार्यक्रम सन 2019-20 याविषयी माहिती देताना जिल्हाभरात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. शैक्षणिक गुणवत्ता कक्षाची रचना, भूमिका व कामे, गुणवत्ता विकासासाठी सामाजिक संस्थांची भूमिका, अपेक्षित शैक्षणिक मदत याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव, रमेश चौधरी, विषय सहायक प्रमोद बागले, शिवाजी ठाकूर विविध उपक्रमांची माहिती दिली. विषय सहायक प्रकाश भामरे यांनी प्राचार्य राजेंद्र कांबळे, वरिष्ठ अधिव्याख्याता रमेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या ‘सातपुडय़ाचा शब्दसागर’ या शिक्षकांना अत्यंत उपयुक्त अशा बोलीभाषेच्या पुस्तिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, जि.प.चे उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनीही मार्गदर्शन केले. सभेला सर्व अधिव्याख्याता, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, आदिवासी विकास प्रकाल्पाचे प्रकल्प अधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटसाधन केंद्राचे विषय तज्ञ, विषय सहाय्यक, जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ज्ञानप्रकाश फाऊंडेशन, पिरॅमल फाऊंडेशन, प्रथम फाऊंडेशन, ल्युपीन फाऊंडेशन, मुथा फाऊंडेशन या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन वरिष्ठ अधिव्याख्याता जे.एस. पाटील यांनी केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी प्रय} करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 12:49 PM