लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समाजातील काही शिक्षक व्यसनाधीनतेच्या आहारी गेले असल्याची खंत व्यक्त करीत, निर्भयता, धर्मनिरपेक्षता आणि परिपक्वता सिद्ध करून शिक्षकांनी समाजापुढे यावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली आहे.इंदिरा गांधी मंगल कार्यालयात जिल्हा शैक्षणिक संघटना समन्वय समितीच्यावतीने कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी साहित्यिक सबनीस बोलत होते. अध्यक्षस्थानी शिव महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी प्राचार्य बी.एस. पाटील होते. या वेळी सत्कारमूर्ती प्राचार्य डॉ.एन.डी नांद्रे यांच्या गौरव अंकाचे प्रकाशन साहित्यिक डॉ.सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले.डॉ.सबनीस म्हणाले, शिक्षक नेहमी निर्भय, संशोधक, सर्वस्पर्शी व धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीच्या असला पाहिजे. शिक्षकांनी त्यांच्यातली निर्भयता व धर्मनिरपेक्षता परिपक्व असल्याचे सिद्ध करायला हवे. अनेक शिक्षक आज गैर मार्गाच्या वळणावर लागलेली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.प्राचार्य डॉ.एन.डी नांद्रे यांना मानपत्र, शाल व पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सामूहिक सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन प्रा.एस.एन पाटील यांनी केले. याप्रसंगी आमदार सुधीर तांबे, सबनीस, द्वारकाबाई नांद्रे, नलिनी नांद्रे, माजी शिक्षक आमदार जयंतराव ठाकरे, माजी आमदार दिलीप सोनवणे, पीडीएफचे राज्याध्यक्ष विजय बहाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संदीप बेडसे, ज्येष्ठ विधिज्ञ उत्तमराव मराठे, श्रीपत पटेल, पीडीएफचे जिल्हाध्यक्ष अनिल चौधरी, विमा भामरे, बि.के नांद्रे, जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जे.के. पाटील, हिरालाल पगडाल, साहित्यिक प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, गजेंद्र भोसले, आर.एस. बाविस्कर, वेतन अधीक्षिका मीनाक्षी गिरी आदी उपस्थित होते.प्राचार्य डॉ.नांद्रे यांनी सत्काराला ुउत्तर दिले. प्रास्ताविक श्रीपत पटेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.राजेंद्र शिंदे व चेतना बिरारीस तर आभार प्रा.प्रभाकर नांद्रे यांनी मानले.
शिक्षक सर्वस्पर्शी व धर्मनिरपेक्ष असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:12 PM