लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या रविवारी नाशिक विभागात सर्वाधिक उष्ण जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याचा सर्वत्र गवगवा झाला़ अचानकपणे दिल्या गेलेल्या वाढीव आकडेवारीचा शोध प्रशासन घेत आह़े मात्र तूर्तास नंदुबार जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमान सुरळीतपणे नोंद घेतली जात आह़े नंदुरबार जिल्ह्यात ऋतूमानानुसार बदलणा:या हवामानाची नोंद भारतीय हवामान खाते, कुलाबा वेधशाळा या दोन्ही शासकीय संस्थांकडून तसेच स्कायमेट या खाजगी संस्थेकडून घेतली जात़े दैनंदिन तापमान, पजर्न्यमान, उष्णता, आद्र्रता, वा:याचा वेग यांच्या नोंदी घेण्यासाठी तिन्ही संस्थांमध्ये विशेष करार करण्यात आला आह़े या तिन्ही विभागांनी घेतलेल्या नोंदीची दर दोन तासांनी तपासणी करून ही आकडेवारी उपग्रहाद्वारे दिल्ली येथे पाठवण्यात येत़े गत रविवारी नंदुरबार येथील तापमान हे नाशिक विभागातील सर्वाधिक तापमान असल्याची बातमी एका इंग्रजी दैनिकाने दिल्यानंतर एकच खळबळ उडाली होती़ जिल्ह्यात 38 मंडळनिहाय हवामान यंत्र, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, शहादा, नवापूर आणि नंदुरबार तालुक्यात साखर कारखाने, आणि जिल्हाधिकारी कार्यालय अशा 44 ठिकाणी रविवारी दिवसाचे तापमान 33 अंशापेक्षा अधिक नसतानाही दिल्या गेलेल्या आकडेवारीमुळे एकच गहजब उडाला होता़ सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने सर्व तापमान यंत्रांचा आढावा घेण्याचे काम हाती घेतले आह़े सुरळीत चालणा:या सर्वच यंत्रांची दर दोन तासांनी नोंदणी होत आहे, किंवा नाही, याचा आढावा घेत, जिल्हा प्रशासनाने तसा अहवाल हवामान खात्याकडे पाठवल्याचे सांगण्यात आले आह़े नंदुरबार शहरात कृषी महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी तापमानाची नोंद घेणारी यंत्रे आहेत़ दोन्ही यंत्रे भारतीय हवामान खात्याच्या अखत्यारित आहेत़ स्वयंचलित या यंत्रांच्या नोंदी दर दोन तासांनी कुलाबा वेधशाळा आणि दिल्ली येथील मुख्यालयात उपग्रहाद्वारे पाठवल्या जातात़ याबाबत कृषी महाविद्यालयाचे डॉ़ अरूण कांबळे यांनी सांगितले की, हवामान खात्याने या यंत्रांचे नियंत्रण करण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले आहेत़ त्यांच्याकडून वेळोवेळी नोंदीचा आढावा घेतला जातो सध्या यंत्र सुस्थिती सुरू आह़े या यंत्रांमुळे कृषी क्षेत्र आणि नागरी क्षेत्राला धोक्याच्या सूचना ह्या तात्काळ देण्याची सोय आह़े जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्राच्या नोंदी कुलाबा वेधशाळेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पाठवल्या जातात़ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी या नोंदींचा दिवसभरात वेळोवेळी आढावा घेतात़ व्यतिरिक्त पुरूषोत्तम नगर, डोकारे आणि समशेरपूर येथील तिन्ही साखर कारखाने तसेच कृषी विज्ञान केंद्र येथील तापमान यंत्रेही सुस्थितीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आह़े
जिल्ह्यात 44 ठिकाणी तापमानाची सुरळीत नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 12:11 PM