नंदुरबार - - मालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. शहादा तालुक्यातील म्हसावद येथे झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले.
मालवाहतुक करणा-या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. रिक्षा मधील सर्व प्रवासी तलावडी येथे राहणारे आहेत. ट्रक धडगाव येथून तर रिक्षा भोंगरा येथून येत असताना हा अपघात घडला.
गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतणारे चौघे जागीच ठार झाले.उसाची गाडी अचानक रस्त्यावर आल्याने ट्रकने रिक्षाला धडक दिली. एकूण 15 जण जखमी झाले आहेत.
मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यूमालेगाव-सटाणा रस्त्यावर गुरुवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपे रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सटाणा- मालेगाव रोडवर शेमळी शिवारात गुरुवारी (28 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
मालेगावकडून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अपे रिक्षाला शेमळी शिवारात अज्ञात ट्रकने धडक दिल्याने रिक्षातून प्रवास करणा-या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपे रिक्षाला धडक देऊन पसार झालेल्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही.
त्यांचे मृतदेह सटाणाच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र अपघात स्थळी सापडलेली खेळणी व अन्य साहित्यावरुन सर्वजण व्यावसायिक असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सटाण्यात सुरू असलेल्या यशवंत महाराज यात्रेत खेळणी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी हे व्यावसायिक येत असल्याचेही माहिती समोर आली आहे.