शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

महामार्गाच्या पहिल्या व दुस:या टप्प्याची निविदा प्रक्रिया रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 1:09 PM

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते खेतिया या महामार्गाच्या केवळ तिस:या टप्प्याला चालना मिळाली आहे. पहिला व दुसरा टप्पा अद्यापही फारसा प्रगतीपथावर नसल्याची स्थिती आहे. यामुळे या महामार्गाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हला सात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विसरवाडी ते खेतिया या महामार्गाच्या केवळ तिस:या टप्प्याला चालना मिळाली आहे. पहिला व दुसरा टप्पा अद्यापही फारसा प्रगतीपथावर नसल्याची स्थिती आहे. यामुळे या महामार्गाच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान, शेवाळी ते नेत्रंग या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.नंदुरबार जिल्हला सात महामार्गानी जोडले जाणार आहे. त्यासाठी भारतमाला प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत त्यांना मंजुरी मिळाली आहे. नंदुरबारातून आधीच अमरावती-सुरत हा महामार्ग व ब:हाणपुर-अंकलेश्वर हा राज्यमार्ग गेलेला आहे. आता नव्याने विसरवाडी ते सेंधवा, शेवाळी ते नेत्रंग, सोनगीर ते विसरवाडी, सोनगीर ते धडगाव हे महामार्ग मंजुर झाले आहेत. यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा हा मध्यवर्ती व केंद्रबिंदू ठरणार आहे. सध्या केवळ विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाअंतर्गत कोळदा ते खेतिया या टप्प्याचे काम प्रगतीपथावर आहे. याच महामार्गाचे पहिल्या दोन टप्प्यातील काम रेंगाळले आहे.तीन टप्प्यात कामविसरवाडी ते खेतिया दरम्यानच्या महामार्गाचे काम हे तीन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा हा विसरवाडी ते काळंबा असा आहे. दुसरा टप्पा काळंबा ते कोळदा व तिसरा कोळदा ते खेतिया असा आहे. या तीन टप्प्याअंतर्गत हे काम दोन वर्षात पुर्ण करावयाचे आहे. परंतु सद्य स्थितीत केवळ तिस:या टप्प्याचे काम सुरू आहे. पहिला व दुसरा टप्पा हा निविदा प्रक्रियेत अडकला आहे.या महामार्गाअंतर्गत तीन ठिकाणी नवीन पुल बांधरण्यात येणार आहेत. त्यात नवापूर तालुक्यात एक, शहादा तालुक्यातील दोन पुलांचा समावेश आहे. त्यातील तापीवरील प्रकाशा पूल हा सर्वात मोठा राहणार आहे. त्या खालोखाल गोमाई नदीवरील डामरखेडा शिवारातील पुलाचा समावेश आहे. नवापूर तालुक्यातील पूल हा लहान राहणार आहे. लोणखेडा येथे गोमाई नदीवर आधीच दुसरा पूल पुर्ण झालेला आहे. टोलनाक्याबाबत उत्सूकताया महामार्गाचा टोलनाक्यांबाबत उत्सूकता लागून आहे. विसरवाडी ते नंदुरबार दरम्यान काळंबा व शहादा ते प्रकाशा दरम्यान एका ठिकाणी असे दोन ठिकाणी टोलनाके राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.    त्यासाठी मात्र अद्याप अनिश्चितता असून काही बदल होण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रियापहिले दोन टप्पे निविदा प्रक्रियेत अडकले आहेत. पैकी एका टप्प्याची निविदा प्रक्रिया मंजुर असून दुस:या टप्प्याची अंतिम टप्प्यात आहे. दोन निविदा मंजुर झाल्यानंतर एकाच वेळी कामाला सुरुवात होणार असल्याचे समजते.संपुर्ण काँक्रीटीकरणप्रस्तावीत हा संपुर्ण महामार्ग दहा मिटरचा राहणार आहे. याअंतर्गत संपुर्ण रस्ता हा काँक्रीटीकरणाचा राहणार आहे. गाव हद्दीत रस्त्याच्या दोन्ही बाजुला गटारी व स्लॅब ड्रेन राहणार आहे. अशा प्रकारचा संपुर्ण काँक्रीटीकरणाचा हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच महामार्ग असल्याचे सांगण्यात आले.अंतर होणार कमीसुरतकडून इंदोरकडे जाणा:या वाहनांसाठी हा महामार्ग सोयीचा ठरणार आहे. आताच्या परिस्थितीत सुरतहून नवापूर, धुळे, शिरपूर, सेंधवामार्गे इंदोरला जावे लागते. हा महामार्ग झाल्यास सुरतहून नवापूर, विसरवाडी, नंदुरबार, शहादा, खेतिया मार्गे थेट मुंबई-आग्रा महामार्गाला सेंधवा येथे जोडला जाणार आहे. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही मोठी बचत होणार आहे. शिवाय विसरवाडी ते धुळे र्पयतची सुरत-अमरावती या महामार्गाची आणि धुळे ते सेंधवा या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गाची वाहतुकीचा ताण देखील कमी होणार आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नंदुरबारातील वळण रस्त्यांचा प्रश्न मात्र रखडला आहे. आहे त्याच वळण रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी आणखी वाढणार आहे. परिणामी शहरवासीयांना त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.विसरवाडी ते खेतिया या दरम्यानच्या महामार्गाच्या कामाला चालना मिळावी अशी मागणी होत आहे.प्रस्तावीत महामार्ग शेवाळी फाटय़ापासून सुरू होऊन धुळे जिल्ह्यातील निजामपूर, छडवेल, नंदुरबार, हातोडापूल मार्गे तळोदा, अक्कलकुवा, खापरमार्गे गुजरात हद्दीत प्रवेश करणार आहे. गुजरातमध्ये राजपिपला, डेडीयापाडा व नेत्रंग येथे हा महामार्ग संपणार आहे. नेत्रंग येथून जाणा:या प्रस्तावित एक्सप्रेसवेला तो जोडला जाणार आहे. यामुळे नाशिक, धुळे, जळगाव भागाकडून अहमदाबाद, राजस्थानकडे जाणा:या मालवाहू वाहनांसाठी हा महामार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. हा महामार्ग पूर्वी शेवाळी फाटय़ापासूनच चौपदरी होता. परंतु नंतर त्यात बदल करण्यात आला. आता शेवाळी ते तळोदा दरम्यान दहा मिटर तर तळोदापासून पुढे चौपदरी राहणार आहे. या महामार्गासाठीच्या जमीन संपादनाचा वाद देखील गाजला होता.