लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण आणि सिकलसेल यामुळे बेजार असलेल्या जिल्ह्यात थॅलेसिमिया या दुर्धर आजाराचे 37 रूग्ण आहेत़ दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत असतानाच थॅलेसिमियाग्रस्तांना शासकीय मदतीची गरज भासत असल्याचेही वास्तव समोर येत आह़े दीर्घ काळ उपचार आणि त्यातून निष्पन्न होणारे तुटपुंजे यश असा खेळ असलेल्या या आजारामुळे खासकरून लहानग्यांचे बालपण हिरावले जात आह़े या आजारातून बचावण्यासाठी लागणारा अफाट खर्च कमी होऊन जिल्ह्यात सुविधा मिळाव्यात यासाठी तळोदा येथील सात वर्षीय थॅलेसिमियागग्रस्त चिमुरडी दीक्षा गणेश गुरव हीने मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे साद घालून आजाराने बेजार झालेल्या रूग्णांची मूळ समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आह़े गुरूवारी तळोदा दौ:यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना दीक्षासह तिच्या पालकांनी पत्रवजा निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता़ हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वीय सहायकांनी स्विकारले होत़े यात म्हटले आहे की, थॅलेसेमिया व सिकलसेल हे अनुवांशिक असे असाध्य आजार असून नंदुरबार जिल्ह्यात 37 थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण आहेत़ या रुग्णांचे हिमोग्लोबिन कमी कमी होते म्हणून त्यांना दर महिन्यास वयाप्रमाणे 1 किंवा 2 रक्ताच्या पिशव्या द्याव्या लागतात. त्यांची दर चार ते सहा महिन्यांनी शारीरिक तपासणी करावी लागते. या आजाराचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक औषधे घ्यावी लागतात. हे सर्व करताना रुग्णाच्या आई-वडीलांची आर्थिक, शारीरिक व मानसिक ओढाताण होऊन असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रूग्णाला रक्त देण्यासाठी बालरोगतज्ञाकडे एका दिवसाकरीता दाखल करावे लागत असल्याने, त्यासाठी दिवसाची 500 रूपयांर्पयत फी द्यावी लागते. जिल्ह्यातील बहुतांश पालक हे आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असल्याने त्यांना अनेकवेळी डॉक्टरांची ही फी देणे अशक्य होत़े यासाठी धुळे येथे थॅलिसिमिया डे केअर सेंटर सुरू व्हावे, महिन्यातून एकदा रक्त दिल्यानंतर रूग्णाच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी लागणा:या डेसीरॉक्स ही औषधी गरजेची असत़े नंदुरबार येथे उपलब्ध करण्यात याव्यात, रुग्णांना रक्त देतांना अनेक अनावश्यक रक्त घटक शरीरात जाऊन होणारी गुंतागुंत टाळण्यासाठी लागणारे ल्यूकोसिट फिल्टर शासनाने मोफत उपलब्ध करून द्यावे, थॅलेसेमियाग्रस्त रुग्णांना मोफत प्रवासाची सवलत द्यावी, या रुग्णांना धुळे येथील नवजीवन रक्तपेढी रक्ताचा पुरवठा करत़े रक्ताच्या नॅट चाचणीची मोफत उपलब्धता करून देण्याची आवश्यकता आह़े
नंदुरबारात ‘थॅलेसिमिया’चे 37 रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:32 PM
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुपोषण आणि सिकलसेल यामुळे बेजार असलेल्या जिल्ह्यात थॅलेसिमिया या दुर्धर आजाराचे 37 रूग्ण आहेत़ दिवसेंदिवस रूग्णसंख्येत होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत असतानाच थॅलेसिमियाग्रस्तांना शासकीय मदतीची गरज भासत असल्याचेही वास्तव समोर येत आह़े दीर्घ काळ उपचार आणि त्यातून निष्पन्न होणारे तुटपुंजे यश असा खेळ असलेल्या या आजारामुळे खासकरून ...
ठळक मुद्देतपासणी केंद्राची आवश्यकता या दुर्धर आजारातून बाहेर पडण्याचा बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा एकच उपाय आहे. यासाठी 14 लाख खर्च आहे. उपचाराठी प्रथम एचएलए मॅचिंग टेस्ट व बोन मॅरो ट्रान्सप्लांटची व्यवस्था शासनाने राज्यातील सामान्य रूग्णालयांमध्ये करून दिल्यास अनेक