नंदुरबार : नोटाबंदीच्या निषेधार्थ अणि त्या अनुषंगाने झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी काँग्रेसतर्फे महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घालून थाळीनाद केला. त्यानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पक्षाच्या महिला कार्यकत्र्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या. केंद्र शासनाने पाचशे व हजार रुपयांच्या नोटाबंदीचा घेतलेला निर्णय व त्या अनुषंगाने निर्माण झालेली चलन टंचाई यामुळे नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे दोन टप्प्यात आंदोलन करण्यात आले. 6 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तेथे धरणे धरण्यात आले. त्यानंतर 9 जानेवारी रोजी महिला कार्यकत्र्यानी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून थाळीनाद करीत आंदोलन केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थाळीनाद केल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नोटा बंदीचा निर्णय हा कुठलेही नियोजन न करता घेण्यात आला. त्यामुळे चलन टंचाई निर्माण झाली. सर्वसामान्यांचे त्यामुळे मोठे हाल झाले. बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा अजूनही ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्यांना त्याची झळ सोसावी लागत आहे. नोटा बंदीच्या मागे महाघोटाळा असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.या वेळी जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह नंदुरबारच्या नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, नंदुरबार पंचायत समितीच्या सभापती रंजना नाईक, पं.स.सदस्या ज्योती पाटील, नगरसेविका कश्मिरा बोरसे, विद्या शिंदे, शिलाबाई कडोसे, लीलाबाई साळवे, रोशनआरा जियाउद्दीन, शकुंतला माळी, वंदना पाटील, आशा पाटील, तसलिमबानो शहा, भारती राजपूत, भारती कुंभार, नफिसाबी कुरेशी, विद्या चौधरी, सुरेखा तांबोळी, कविता माळी, भारती पवार आदींसह महिला कार्यकत्र्या मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.धडगाव येथेही निवेदनधडगाव येथे काँग्रेसच्या महिला आघाडीतर्फे नोटा बंदीविरुद्ध तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी नगराध्यक्षा अहिल्याबाई पावरा, कोशीबाई वळवी, सिंधाबाई पाडवी, सुनंदा पाडवी, प्रीती खरे, अनिता वळवी, हारसिंग पावरा, रुपसिंग तडवी, मतीन कुरेशी, मगन वसावे, कल्याणसिंग पावरा आदी उपस्थित होते.नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसतर्फे दोन टप्प्यात आंदोलन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरावरून मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर 9 जानेवारी रोजी सकाळी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. नवापूर चौफुलीपासून महिला कार्यकत्र्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या. तेथे मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थाळीनाद करण्यात आला. साधारणत: तासभर आंदोलन केल्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केले.
काँग्रेसतर्फे थाळीनाद आंदोलन
By admin | Published: January 09, 2017 10:56 PM