लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 10 वर्षापूर्वी जंगलतोड आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे नंदुरबार तालुक्याच्या वनक्षेत्रातून वन्य प्राण्यांनी स्थलांतर केल़े बिबटे, तरस आणि हरीणवर्गीय प्राणी नावालाही उरले नाहीत़ परंतू वनक्षेत्रात झाडांची लागवड आणि पाणवठे याच्या बळावर आता पुन्हा हे प्राणी परत येत असून यात मोर आणि काळवीटांचा संचार सर्वाधिक सुखद ठरत आह़े नंदुरबार तालुक्याच्या दक्षिण आणि पश्चिम पट्टय़ातील शेतशिवारात मोरांचा संचार हा काही नवीन नाही़ परंतू मोरांची झालेली शिकार आणि अन्न पाण्याचा तुटवडा यामुळे मोरांनी संरक्षित जागा शोधून येथून स्थलांतर केले होत़े मोरांसाठी संरक्षक असे क्षेत्र असलेल्या ठाणेपाडा, अजेपूर आणि अंबापूर या संयुक्त वनक्षेत्रात त्यांचा पुन्हा वावर वाढवण्यासाठी वनविभागाने कृत्रिम पाणीसाठे निर्माण करुन झाडांची लागवड वाढवली होती़ पाच वर्षे सातत्याने केलेल्या या प्रयोगाला आता यश येत असून ठाणेपाडा रोपवाटिका आणि समोरील डोंगरांवर मोरांचे बागडणे नंदुरबार ते साक्री दरम्यान प्रवास करणा:यांना अचंबित करत आह़े या भागात आजअखेरीस किमान 150 पेक्षा अधिक मोर असल्याची माहिती आह़े मोरांच्या संवर्धनासाठी वनविभागाने गवताची लागवड, झाडांची लागवड वाढवली होती़ सोबत मोरांची शिकार होणे किंवा उपद्रवींकडून मोर पकडून नेण्याचे प्रकार रोखण्यासाठी वनविभागाचे पथक 24 तास या भागात निगराणी करत आह़े मोरांचा संचार ठाणेपाडा आणि अजेपूर परिसरातील शेतशिवारात सुरु झाल्याने शेतकरीही सुखावले असून शेत जमिनीला अपायकारक ठरणारे किटक खाऊन मोर एकप्रकारे शेतक:यांना मदत करत आहेत़ जल्ह्याच्या वनक्षेत्रात मांसभक्षी प्राणी बहुसंख्य आहेत़ परंतू तृणभक्षी प्राण्यांची संख्या मात्र अत्यंत नगण्य आह़े वनक्षेत्रात कधीकाळी बागडणारे काळवीट आणि निलगायींचे कळप जाऊन ही संख्या बोटावर मोजण्याएवढीच झाली होती़ यासाठी वनविभागाने प्रयत्न सुरु केले होत़े या प्रयत्नांना ठाणेपाडा वनक्षेत्रातील काळवीटांच्या संचाराने यश आले आह़े या भागात काळवीट किती याबाबत गोपनियता बाळगली जात असली तरी त्यांची संख्या ही वनक्षेत्रातील अन्नसाखळीसाठी पूरक असल्याचे सांगण्यात आले आह़े काळवीटांचा संचार पर्यटकांसाठी आकर्षण ठरु शकतो़
मोरांच्या रहिवासाने बहरले ठाणेपाडा वनक्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:17 PM