शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

महाराष्ट्रातील पहिल्या मतदार राहतात गुजरातेत

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: April 11, 2024 11:23 AM

पहिले मतदान केंद्र मणिबेली उपेक्षितच

रमाकांत पाटील

नंदुरबार : लोकसभेचा पहिल्या क्रमांकाचा  मतदारसंघ म्हणून नंदुरबारची ओळख आहे. याच मतदारसंघातील  पहिले मतदान केंद्र अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेली, तर येथील मतदार यादीतील पहिल्या क्रमांकाच्या मतदार आहेत ४६ वर्षांच्या  रविता पंकज तडवी. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील या पहिल्या मतदार सध्या गुजरातमध्ये वास्तव्यास असून मतदान महाराष्ट्रात येऊन करणार आहेत.

कोण आहे पहिल्या क्रमांकाची मतदारमतदार यादीतील पहिल्या क्रमांकावर रविता पंकज तडवी ही महिला आहे. त्या पुनर्वसित असून, त्यांचे पुनर्वसन गुजरातमधील परवेटा येथे झाले आहे. मात्र, मतदान येथेच असल्याने निवडणुकीसाठी मतदानाला त्या येथे येणार आहेत.  विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत पहिले नाव वरसन वसावे यांचे होते. मात्र,  मणिबेली केंद्राच्या सुधारित यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावरून खाली गेले आहे.

मणिबेली हे मतदान केंद्र अतिदुर्गम भागात असून, याठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांनाही दोन दिवस आधीच निघून नर्मदेच्या पाण्यातून प्रवास करीत केंद्र गाठावे लागते. सरदार सरोवर प्रकल्पातील पहिले बुडीत गाव म्हणजे मणिबेली. या गावात आजही ३४१ मतदार असून, हे गाव गेल्या चार दशकांपासून कधी प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे तर कधी निवडणुकीतील वेगळेपणामुळे चर्चेत आहे. 

पुनर्वसनानंतर याठिकाणी सुमारे ४५० नागरिक वास्तव्यास आहेत. गावाला जाण्यासाठी आजसुद्धा पक्का रस्ता नाही, गावात वीज नाही आणि नर्मदेच्या काठावर असले, तरी पाण्याची तीव्र टंचाई आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी या असुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी मतदानावरच बहिष्कार टाकला होता.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदानlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Gujaratगुजरात