शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पोलिसांनी केला १२ किमी पाठलाग, पण तरीही दरोडेखोर निसटले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 5:57 AM

सराफाला लुटणारे फरार, वाहनासह सोने-चांदीची बॅग हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : नंदुरबार येथील सराफा व्यावसायिकाला लुटून येणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी निजामपूर पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटरचा पाठलाग केला. दरोडेखोरांना पकडण्यासाठी रस्त्यावर वाहनेही आडवे लावण्यात आले. रस्त्यावरील वाहनधारकांनी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा थरार अनुभवला. मात्र, दरोडेखोर वाहन सोडून फरार झाले.  वाहनात चोरलेली बॅग व एक पिस्तूल सापडले असून, पोलिसांनी ते जप्त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदुरबार येथील सराफा व्यावसायिक रूपेश सुमनलाल सोनार हे शुक्रवारी आपले दुकान बंद करून घरी जात होते. त्यांच्याजवळ असलेली सोने-चांदीची बॅग चोरट्यांनी हिसकावून चारचाकी वाहनाने त्यांनी पोबारा केला. चोरटे निजामपूरकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छडवेल जवळ पोलिसांनी चोरट्यांच्या वाहनाला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी जैताणेकडे पळ काढला. तेथून पोलिसांनी तब्बल १२ किलोमीटर अंतरापर्यंत चोरट्याच्या वाहनाचा पाठलाग केला. चोरांना पकडता यावे, यासाठी पोलिसांनी खुडाणे चौफुलीजवळ रस्त्यावरच ट्रक, रिक्षा आडव्या उभ्या केल्या. पुढे जाण्यास अडचण असल्याचे बघून चोरट्यांनी पुन्हा नंदुरबार रस्त्याकडे आपले वाहन वळविले. वाजदरे गावाच्या जवळ पूर्वच्या दिशेने आखाडे गावाकडे त्यांनी गाडी नेली. मात्र, पोलिसांचा पाठलाग सुरूच होता. चोरट्यांनी नदीकडे गाडी नेली. त्याच ठिकाणी आपले वाहन सोडून चोरट्यांनी लगतच्या जंगलात पळ काढला.पोलिसांनी चाेरट्यांचे वाहन ताब्यात घेतले. या वाहनात एक पिस्तुलीसह सोने-चांदीचे दागिने असलेली बॅगही आढळून आली. या बॅगेत नेमके कितीचे दागिने होते, हे मात्र समजू शकले नाही. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnandurbar-pcनंदुरबार