म्हसावद : शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत मंगळवारी रात्री कुलूप तोडून शालेय पोषण आहाराचा तांदूळ, वाटाणे, मठ आदी साहित्य चोरांनी चोरले. रविवारी रात्री चोरी करण्याचा प्रय} झाला. त्याबाबत म्हसावद पोलिसात तक्रारही देण्यात आली. दरम्यान मंगळवारीही रात्री चोरांटय़ांनी या ठिकाणी डल्ला मारून 31 हजार 520 रुपयांचा सामान चोरून नेला.याबाबत असे की, येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा जून 2015 पासून बंद आहे. मात्र या शाळेत शालेय दप्तर, पोषण आहार ठेवला जातो. रविवारी रात्री दरवाजाची कडी कापण्याचा प्रय} करण्यात आला. सोमवारी सकाळी मुख्याध्यापिका आशा रवींद्र चौधरी यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत म्हसावद पोलिसात तक्रार नोंदवली. दरम्यान, मंगळवारीदेखील रात्री चोरटय़ांनी कुलूप तोडून 70 किलो तांदूळ, पाच किलो वाटाणे, पाच किलो मठ, जुने रेकॉर्ड दप्तरांचे दोन गठ्ठे, कॅमेरा, सात चटया, टाईप राईटर, टेलेस्कोपचे स्टॅण्ड, अपंग समावेशित योजना अंतर्गतचे दोन टेबल व साहित्य असा एकूण 31 हजार 520 रुपयांचा ऐवज चोरून नेला.चोरीच्या घटनेबाबत सरपंच बिंदा रिवन ठाकरे, गौतम शंकर अहिरे, हेमंत महिंद्रे, सविता निंबा साळुंखे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या वेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. याबाबत गटशिक्षणाधिकारी उषा पेंढारकर यांनी पोलिसात तक्रार देण्याविषयी सांगितले. त्यानुसार म्हसावद पोलिसात मुख्याध्यापिका आशा चौधरी यांनी तक्रार नोंदविली असून, पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)रविवारीही झाला प्रय}चोरटय़ांनी चोरी करून अस्ताव्यस्त सामान फेकल्याचे आढळून आले. चोरी केल्यानंतर चोरटे दरवाजाला दुसरे कुलूप लावून गेल्याने चोरटे स्थानिकच असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे.रविवारी रात्री कडी कापण्याचा प्रय} झाला; मात्र ती कापली गेली नसल्याने मंगळवारी पुन्हा प्रय} करून चोरी करण्यात आली.केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे यांनी तत्काळ भेट देऊन मार्गदर्शन केले.
शाळेतून पोषण आहाराची चोरी
By admin | Published: March 22, 2017 11:40 PM